Rakesh Sharma यांच्यानंतर आता ‘हा’ भारतीय अंतराळात झेपावणार

67
Rakesh Sharma यांच्यानंतर आता 'हा' भारतीय अंतराळात झेपावणार
Rakesh Sharma यांच्यानंतर आता 'हा' भारतीय अंतराळात झेपावणार

१९८४ मध्ये राकेश शर्मा (Rakesh Sharma) हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले होते. त्यांच्यानंतर आता शुभांशू शुक्ला अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच अंतराळ स्थानकाच तब्बल २८५ दिवसांच्या वास्तव्यानंतर भारतीय मूळ असलेली अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स (Sunita Williams) आणि अमेरिकेचे बुच विल्मोर (Barry Wilmore) हे नासाचे (NASA) अंतराळवारी पृथ्वीवर परतले आहेत. त्यानंतर आता शुभांशु शुक्लाच्या (Shubhanshu Shukla) रुपाने आणखी एक भारतीय अंतराळात झेपावणार आहे.

( हेही वाचा : BMC : खासगी सहभाग तत्वावरील रुग्णालयांमध्ये महापालिकेचे रुग्ण कोण? कुणाला मिळणार मोफत उपचार?

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ल हे Axiom Mission 4 (Ax-4) अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत. ते एक इंडियन एअरफोर्समधील अनुभवी पायलट आहेत. स्पेसएक्स ड्रॅगन (SpaceX Dragon) अंतराळयानात मिशन पायलट म्हणून ते काम पाहणार आहेत. गगनयान मोहिमेचा देखील भाग असलेल्या शुक्ला यांच्या अंतराळ मोहिमेचा प्रारंभ किंवा प्रक्षेपण सोहळा मे २०२५ मध्ये फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून पार पडणार आहे. हे मिशन भारताच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधनातील सहभागासाठीदेखील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात आहे.

Ax-4 मिशनचे नेतृत्व माजी NASA अंतराळवीर पेगी व्हिटसन करणार आहेत, तर पोलंडचे सावोश उझनान्स्की-विश्विव्हस्की आणि हंगेरीचे तिबोर कापू मिशन स्पेशालिस्ट म्हणून सहभागी असतील. ही मोहिम १४ सूक्ष्म गुरूत्वाकर्षणातील वैज्ञानिक प्रयोग, शैक्षणिक उपक्रम आणि व्यावसायिक कार्यासाठी आयोजित केली आहे.गगनयान मोहिमेत चार भारतीय अंतराळवीर अंतराळात पाठवले जाणार आहेत. त्यात शुभांशु शुक्ला यांच्यासह प्रशांत बालक्रिष्णन नायर, अजित क्रिष्णन, अंगद प्रताप (Angad Pratap) यांचाही समावेश आहे. तथापि, या मोहिमेला अजून अवकाश आहे. तत्पुर्वी शुभांशू हे Axiom Mission 4 (Ax-4) अंतर्गत अंतराळात जात आहेत.

या प्रवासाबद्दल बोलताना शुक्ला (Shubhanshu Shukla) म्हणाले, “मी जरी वैयक्तिकरित्या अंतराळात जात असलो तरी, हा प्रवास 1.4 अब्ज भारतीयांचा आहे.” दरम्यान, या मोहिमेसह, भारत जागतिक अंतराळ क्षेत्रात आपले योगदान अधिकाधिक बळकट करत आहे आणि भविष्यातील अंतराळ संशोधक व अंतराळवीरांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे.

दरम्यान शुक्ला (Shubhanshu Shukla) भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रांतांतील कलावस्त्र ते सोबत नेणार आहेत आणि अंतराळात योगासने सादर करणार आहेत. त्यांच्या सहभागामुळे जागतिक अंतराळ संशोधनात भारताच्या वाढत्या भूमिकेवरही प्रकाश टाकला जात आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.