टॅक्सीसाठी हात दाखवताय, पण ती रिकामी आहे का? आता सहज समजणार…

150

बऱ्याचदा रस्त्यावर उभे असताना आपण टॅक्सीची वाट पाहत असतो, मात्र त्या टॅक्सीत प्रवासी आहे की नाही हे आपल्या लक्षात येत नाही. कित्येकदा भरलेल्या टॅक्सीला नागरिक हात दाखवता मात्र टॅक्सीत आधीपासून प्रवासी असल्याने ती टॅक्सी आपल्यासाठी थांबली नाही की आपली इतर वाहनांसाठी शोधा-शोध सुरू होते. मात्र आता हे टेन्शन कमी होणार आहे कारण आता ‘रुफ लाइट इंडिकेटर’ टॅक्सीवर बसवलेले दिसणार आहे. संध्याकाळच्या वेळी घाईत अनेकदा टॅक्सीच्या उपलब्धतेवरुन टॅक्सी चालक आणि प्रवाशांमध्ये खटकेही उडताना आपण पाहिले आहेत, पण आता प्रवाशांना संभ्रमात टाकणारं टॅक्सीच्या उपलब्धतेचं हे टेंशन नव्या वर्षात संपणार आहे. टॅक्सी सहज उपलब्ध होण्यासाठी त्यावर ‘रुफ लाइट इंडिकेटर’ बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तीन रंगात असणार इंडिकेटर

नव्या वर्षात प्रवाशांना काळ्या-पिवळ्या टॅक्सीची उपलब्धता समजावी यासाठी रुफ लाइट इंडिकेटरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टॅक्सीच्या वरच्या बाजूला तीन रंगांत एकच इंडिकेटर बसवले जाणार आहे. यामध्ये हिरवा रंग दिसत असल्यास सेवा उपलब्ध असल्याचे प्रवाशांना समजू शकेल. त्या टॅक्सीमध्ये प्रवासी असल्यास इंडिकेटरवर लाल रंग दाखवेल आणि टॅक्सीचं इंडिकेटर जर पांढऱा रंग दाखवत असेल, तर त्या टॅक्सीची सेवा बंद असल्याचे सिग्नल आहे, अशा पद्धतीने परदेशातही सेवा दिली जाते.

( हेही वाचा :कोकणवासीयांची व्यथा! रेल्वे दारासमोरुन जाते, पण…)

या दोन भाषांमध्ये सेवा उपलब्ध

नवीन वर्षांत या गाड्या इंडिकेटरसह प्रवाशांच्या सेवेत येतील, अशी माहिती ताडदेवचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली. अद्याप फेब्रुवारी २०२० च्या पूर्वीच्या जुन्या टॅक्सींवर इंडिकेटर बसवण्याचा निर्णय झालेला नाही. रुफलाईट इंडिकेटर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.