आगामी ३ महिन्यांच्या काळात इंडिगो (Indigo) कंपनीची जवळपास ३० विमाने इंजिनमध्ये बिघाड झाल्याने जमिनीवर स्थिरावण्याची शक्यता आहे. यामुळे इंडिगो कंपनीच्या अडचणीत लवकरच वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याच समस्येमुळे कंपनीची ५० विमाने यापूर्वीच देशातील विविध विमानतळांवर उभी आहेत. त्यात आता या नव्या ३० विमानांची भर पडली आहे. त्यामुळे कंपनीची एकूण ८० विमाने जमिनीवरच असतील. आगामी सुट्ट्यांच्या काळात भारतीय अवकाशातून ८० विमाने कमी होणार असल्याने विमान तिकिटांच्या किमती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. सध्या कंपनीच्या ताफ्यात एकूण ३३० विमाने आहेत.
(हेही वाचा – Weather Update: येत्या ४ दिवसांत पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट)
तांत्रिक दोषाचा फटका
देशातील बहुतांश विमानतळांवर कंपनीची सेवा सुरू आहे, तर परदेशातही काही ठिकाणी कंपनीची विमाने उड्डाण करतात. मे महिन्यात गो-फर्स्ट कंपनीच्या ताफ्यातील ५६ पैकी २५ विमाने इंजिनात बिघाड झाल्यामुळे जमिनीवर स्थिरावली होती. त्यानंतर विमानांची संख्या कमी झाल्यामुळे तिकिट दरात वाढ झाली होती. त्यात आता इंडिगोच्या विमानांची भर पडणार आहे. कंपनीच्या विमानांचे इंजिन हे प्रॅट अँड व्हिटनी या कंपनीचे आहे. या इंजिनमधील तांत्रिक दोषाचा फटका केवळ भारतीयच नव्हे, तर जगातील अनेक विमान कंपन्यांना बसला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community