Indigo Bumper 2023 : २०२३ मध्ये इंडिगो एअरलाईन्समधून १०० दशलक्ष प्रवाशांनी केला प्रवास

२०२२ च्या तुलनेच इंडिगोच्या प्रवाशांमध्ये २२ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे.

237
Indigo Bumper 2023 : २०२३ मध्ये इंडिगो एअरलाईन्समधून १०० दशलक्ष प्रवाशांनी केला प्रवास
Indigo Bumper 2023 : २०२३ मध्ये इंडिगो एअरलाईन्समधून १०० दशलक्ष प्रवाशांनी केला प्रवास
  • ऋजुता लुकतुके

इंडिगो एअरलाईन्स ही कमी तिकीट दर असलेली कंपनी भारताची पहिली विमान कंपनी ठरली आहे, जिने एका वर्षात १०० दशलक्षाच्या वर प्रवासी वाहून नेले. आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर मिळून कंपनीने २०२३ मध्ये १०४,४९७,६४६ प्रवाशी वाहून नेले. यातील ९ कोटी प्रवासी देशांतर्गत मार्गांवरील तर १.४ कोटी प्रवासी आंतरराष्ट्रीय मार्गावरील होते. (Indigo Bumper 2023)

विमान कंपनीसाठी वर्षभरात १० कोटीचा आकडा ही एक मोठी गोष्ट आहे. या कामगिरीमुळे इंडिगो कंपनी जागतिक स्तरावर अशी कामगिरी करणाऱ्या मोजक्या १० विमान कंपन्यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. २०२३ वर्षातील १.९ कोटी प्रवासी हे कॉर्पोरेट बुकिंग असलेले आणि इतर ८.४ कोटी ग्राहक हे पर्यटक किंवा अधून मधून प्रवास करणारे होते, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. (Indigo Bumper 2023)

(हेही वाचा – Massive Fire : डोंबिवलीत बहुमजली इमारतीच्या ११ मजल्यांना लागली भीषण आग)

२०२२ मध्ये कंपनीने इंडिगोची प्रवासी संख्या ७८ दशलक्ष इतकी होती. म्हणजेच २०२३ मध्ये यात २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. इंडिगो कंपनीने यावर्षी आणखी एक मापदंड पार केला आहे. एका दिवसात विमानाची २००० च्या वर उड्डाणं करणारी ती पहिली भारतीय विमान कंपनी आहे. इंडिगोनं आपल्या विमान सेवेनं ११८ ठिकाणं जोडली आहेत. आणि यातील ३८ मार्ग परदेशातील आहेत. (Indigo Bumper 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.