Indigo Flight Delay : इंडिगोच्या ‘त्या’ विमानात नेमकं काय घडलं?

विमानाला १० तास उशीर झाल्यावर मुंबईत इंडिगोचे प्रवासी थेट रनवेवरच जेवण घेत होते. पण, असं नेमकं काय घडलं, ज्यामुळे विमानाला उशीर झाला?

238
Indigo Flight Delay : इंडिगोच्या 'त्या' विमानात नेमकं काय घडलं?
Indigo Flight Delay : इंडिगोच्या 'त्या' विमानात नेमकं काय घडलं?
  • ऋजुता लुकतुके

मुंबईहून दिल्लीला जाणारं इंडिगो कंपनीचं विमान १० तास झाले तरी धावपट्टीवर आलंच नाही. आणि मग प्रवाशांनी विमानतळाच्या टारमॅकवरच ठिय्या दिला. तेव्हाचा व्हीडिओ व्हायरल झालाय. तिथे बसून प्रवासी जेवत असतानाचा व्हीडिओ सगळ्यात आधी शिवसेनेच्या उद्‌धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केला.

‘इंडिगोनं आधीच वेठीला धरले गेलेल्या प्रवाशांकडून या जगावेगळ्या जेवणासाठी अतिरिक्त पैसे घेतले नसावेत, एवढीच सदिच्छा,’ असं चतुर्वेदी यांनी या ट्विटवर लिहिलं आहे. तर या ट्विटला प्रतिक्रिया देताना एका प्रवाशाने इंडिगोच्या अडकलेल्या विमानातील एका प्रवाशाने विमानाच्या बाहेर बसून आम्ही जेवण घेतलं अशी प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा – Wall Writing Campaign: भाजपची भिंत लेखन मोहीम, मुख्यमंत्री योगी यांनी लिहिल्या घोषणा; वाचा सविस्तर)

एएनआय या वृत्तसंस्थेनं या बातमीचा नंतर पाठपुरावा केला.

१४ जानेवारीच्या रात्रीचा हा प्रसंग आहे. आणि यात विमान नवी दिल्लीहून गोव्याला निघालेलं असताना ते अचानक मुंबईला वळवण्यात आलं. आधीच १०-१२ तास उशीर झाल्यामुळे प्रवासी कंटाळले होते. त्यांनी विमानाबाहेर टारमॅकवर बसून जेवण घ्यायला आणि एकमेकांशी गप्पा मारायला सुरुवात केली. तर काही जण मोबाईलवर बोलतानाही दिसत आहेत.

हा प्रसंग घडल्यानंतर २४ तासांनी इंडिगो कंपनीने यावर स्पष्टीकरणही दिलं. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘एका प्रवाशाने पायलटवर हल्ला केल्यामुळे विमान अचानक मुंबईला वळवावं लागलं. आणि तिथे संबंधित प्रवाशाविरोधात कारवाई करण्यात आली. त्या प्रक्रियेत हा वेळ गेला.’

(हेही वाचा – Asus ROG Phone 8 Series : आसुसचे नवीन फोन आहेत गेमिंगसाठी खास)

दरम्यान प्रवासी आणि पायलट यांच्यात घडलेल्या प्रसंगाचा व्हीडिओही व्हायरल झाला आहे.

नवी दिल्लीत संध्याकाळी धुकं पसरलेलं असल्यामुळे विमानाला उड्डाण करणं कठीण जात होतं. त्यामुळे विमानाला विलंब होत असल्याची उद्घोषणा पायलट करत होते. आणि त्यावेळी अचानक एक प्रवासी तिथे आला आणि त्याने पायलटच्या गालावर एक गुद्दा दिला. विमानाने तोपर्यंत उड्डाण केलेलं होतं. त्यामुळे दिल्लीहून निघून विमानाने मुंबईत आपत्कालीन लँडिंग केलं. आणि तिथे प्रावाशावर कारवाई करण्यात आली. नागरी उड्डयणमंत्री ज्योतीर्दित्य सिंदिया यांनीही झाल्या प्रकाराचा निषेध केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.