गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला (IndiGo get Cause Notice) हवामानाच्या बदलामुळे मुंबईकडे वळवण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळावर प्रवासी जमिनीवर बसून जेवतांना दिसले. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इंडिगोने मागितली माफी –
१४ जानेवारी रोजी गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E2195 विमानाच्या (IndiGo get Cause Notice) घटनेबाबत आम्हाला माहिती आहे. धुक्यामुळे दिल्लीत दृश्यमानता कमी असल्यामुळे हे विमान मुंबईकडे वळवण्यात आले. आम्ही आमच्या ग्राहकांची मनापासून माफी मागतो आणि सध्याच्या घटनेचा तपास करत आहोत.” असे कंपनीने सांगितले आहे.
(हेही वाचा – Virat Kohli : मैदानात घुसलेल्या चाहत्याला सुरक्षारक्षकापासून जेव्हा कोहलीच वाचवतो…)
कारणे दाखवा नोटीस –
अशातच आता या सर्व प्रकारावर नागरी उड्डयन मंत्रालयाच्या नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने (BCAS) इंडिगो आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा (IndiGo get Cause Notice) नोटीस पाठवली आहे. तसेच विमान वाहतूक मंत्रालया (MoCA) ने १६ जानेवारी रोजी या नोटीसचे उत्तर मागितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिलेल्या वेळेत नोटीसला उत्तर मिळाले नाही तर आर्थिक दंडासह कार्यवाही सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
After a video of passengers eating on the tarmac at Mumbai Airport went viral on social media, Union Minister of Civil Aviation Jyotiraditya Scindia held a meeting with all ministry officials at midnight yesterday. In the early hours of 16th January 2024, MoCA’s Bureau of Civil… pic.twitter.com/ep8co2BQkK
— ANI (@ANI) January 16, 2024
काय आहे या व्हिडिओमध्ये?
या वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (IndiGo get Cause Notice) दिसत आहे की ही रात्रीची वेळ आहे, जिथे इंडिगोचे विमान (IndiGo get Cause Notice) उभे आहे, तर काही लोक जवळच जमिनीवर बसले आहेत. कोणाच्या हातात फोन आहे, कोणी एकमेकांशी बोलत आहे तर काही प्रवाशी जेवत आहेत.
Indigo च्या प्रवाशांवर अक्षरशः जमिनीवर बसून जेवण्याची वेळ; व्हिडीओ वायरल
.
.
.#IndigoAirlines #Delhi #Goa #DelhiCold #Fog #MumbaiAirport #Passengers #Food #VideoViral #trending pic.twitter.com/g1JybHCPDG— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) January 16, 2024
(हेही वाचा – Asian Olympic Qualifier : पुरुषांच्या सेंटर फायर पिस्तुल प्रकारात योगेशला दुहेरी सुवर्ण)
इंडिगोच्या प्रवाशाने पायलटला मारहाण केल्याचा आरोप –
सध्या इंडिगोच्या (IndiGo Passenger) विमानातील एका प्रवाशाचा धक्कादायक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो विमानाच्या पायलटला मारहाण करताना दिसत आहे. रविवारी (१४ जानेवारी) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या ए20एन विमानाला १० तासांपेक्षा जास्त उशीर झाला.
(हेही वाचा – Hyundai Creta 2024 : ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टसाठी तुम्ही तयार आहात का?)
उड्डाणाला उशीर झाल्याची घोषणा करत असताना एका प्रवाशाने पायलटवर हल्ला (IndiGo Passenger) केला. त्यानंतर पोलिसांनी प्रवाशाला अटक केली. यापूर्वी शनिवारी (१३ जानेवारी) मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला खराब हवामानामुळे बांगलादेशातील ढाकाकडे वळवण्यात आले होते. (IndiGo get Cause Notice)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community