IndiGo Pilot : उड्डाणापूर्वीच झाला इंडिगोच्या वैमानिकाचा मृत्यू

विमानात बसण्यापूर्वी बोर्डिंग गेटवर कोसळून मृत्यू

146
IndiGo Pilot : उड्डाणापूर्वीच झाला इंडिगोच्या वैमानिकाचा मृत्यू

नागपूर-पुणे इंडिगो विमानाच्या पायलटचा (IndiGo Pilot) गुरुवार १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी नागपूर विमानतळावर मृत्यू झाल्याची घटना घडली. कॅप्टन मनोज सुब्रमण्यम असे या वैमानिकाचे नाव आहे. विमानात जाण्यापूर्वीच ते विमानतळाच्या बोर्डिंग गेटवर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

(हेही वाचा – NIA Raids : संशयित दहशतवादी शमिल नाचनच्या घरावर छापा, महत्वाचे पुरावे लागले एनआयएच्या हाती)

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो कंपनीचे (IndiGo Pilot) विमान गुरुवारी संध्याकाळी नागपूरहून पुण्यासाठी उड्डाण घेणार होते. त्यासाठी वैमानिक कॅप्टन मनोज हे निघाले असतांना ते बोर्डिंग गेटजवळ अचानक कोसळले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे प्राथमिक कारण कार्डियाक अरेस्ट (हृदय विकाराचा धक्का) असल्याचा अंदाज आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

वैमानिकांचे (IndiGo Pilot) काम हे अतिशय कौशल्याचे काम असते. त्यांच्यावर कामामुळे येणारा ताण दूर करण्यासाठी विमान कंपनीकडून त्यांना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात असल्याचे इंडिगोच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.