विमान वाहतूक कंपनी इंडिगोने शनिवारी (दि.१) एक प्रेसनोट जारी केली आहे. यामध्ये त्यांनी चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो ६E ५३१४ फ्लाइटला बॉम्बने उडवण्याची धमकी (IndiGo receives Bomb threat) मिळाली आहे. इंडिगोच्या कर्मचाऱ्याला फ्लाइटच्या स्वच्छतागृहात बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या विमानात एकूण १७२ प्रवासी होते. अशी माहिती कंपनीने प्रसिद्ध कलेल्या निवेदनात दिली आहे, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
विमान मुंबईत उतरल्यानंतर क्रूने प्रोटोकॉलचे पालन करत, सुरक्षा एजन्सीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विमान एका विलगीकरण खाडीत नेण्यात आले. सर्व प्रवासी सुखरूप विमानातून उतरले आहेत. विमानाची सध्या तपासणी सुरू आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर, विमान टर्मिनल परिसरात परत आणले जाईल, असेदेखील कंपनीने (IndiGo receives Bomb threat) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (IndiGo Bomb Threat)
(हेही वाचा – Shaniwar Wada: शनिवारवाडा परिसरात खळबळ! श्वानपथकासह बॉम्बशोधक पथक दाखल, नेमकं काय घडलं ?)
यापूर्वीही २ वेळा बॉम्बची धमकी
यापूर्वी काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे २ वेळा फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. यामध्ये एका प्रकरणात स्वच्छतागृहातच चिठ्ठी सापडली होती. दिल्लीहून बनारसला जाणाऱ्या विमानालाही अशीच धमकी मिळाली होती. दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. दरम्यान शनिवारी (१ जून) चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये अशीच एक चिठ्ठी सापडली. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community