इंडोनेशियाची ‘सिनार्मस’ कंपनी राज्यात करणार २० हजार कोटींची गुंतवणूक

103

एकीकडे उद्योग राज्याबाहेर गेल्याने आरोपसत्र सुरू असताना, आता इंडोनेशियाची ‘सिनार्मस’ ही कंपनी महाराष्ट्रात तब्बल २० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. याद्वारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सात हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कंपनीला २८७ हेक्टर जमिनीचे वाटप पत्र प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण

सिनार्मस पल्प ॲण्ड पेपर प्रा. लि. हा आशियातील सर्वात मोठा कागद निर्मिती क्षेत्रातील उद्योग आहे. हा उद्योग महाराष्ट्रात दोन टप्प्यात २० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे त्यांना २८७ हेक्टर जमीन देण्यात आली आहे. महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. राज्यात गेल्या अडीच वर्षातील सर्व प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात येत असून महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांच्या पाठीशी शासन आहे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

(हेही वाचा राष्ट्रवादीत फूट; देवी सरस्वतीचा अवमान करणाऱ्या भुजबळांना रोहित पवारांनी सुनावले)

औद्योगिक प्रोत्साहन अनुदान देणार

मंत्रिमंडळ उपसमितीच्या २० ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत सिनार्मस पल्प ॲण्ड पेपर कंपनीला टप्पेनिहाय गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कंपनीला औद्योगिक प्रोत्साहन अनुदान देण्यास देखील उपसमितीने मान्यता दिली आहे. ७ वर्षांच्या गुंतवणूक कालावधीमध्ये केलेल्या गुंतवणूकीच्या १०० टक्के अथवा ४० वर्षांच्या औद्योगिक प्रोत्साहन कालावधीमध्ये राज्यात निर्माण केलेल्या १०० टक्के ढोबळ राज्य वस्तू व सेवाकराच्या प्रमाणात यापैकी जे कमी असेल ते औद्योगिक प्रोत्साहन अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.