इंडोनेशियाच्या (Indonesia Landslide) सुलावेसी बेटावर मुसळधार पावसामुळे भुस्खलन (Indonesia Landslide) होऊन किमान १४ जणांचा मृत्यु झाला असुन, तीन जण बेपत्ता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दक्षिण सुलावेसी प्रांतातील ताना तोराजा जिल्ह्यात आजूबाजूच्या टेकड्यांवरून चार घरांवर चिखलाचा ढिगारा पडला, असे स्थानिक पोलिस प्रमुख गुनार्डी मुंडू यांनी सांगितले. (Indonesia Landslide)
(हेही वाचा –MNS : राज आए दुरुस्त आए…)
दुर्गम, डोंगराळ भागातील मकाले आणि दक्षिण मकाले या गावांमध्ये लष्कराचे जवान, पोलिस शोधकार्यात सहभागी झाले. (Indonesia Landslide) बचावकर्त्यांना आठ वर्षांच्या मुलीसह दोन जखमी नागरिकांना बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, असे मुंडू यांनी सांगितले. बचावकर्त्यांनी मकाले गावात किमान ११ मृतदेह आणि दक्षिण मकालेमध्ये ३ मृतदेह बाहेर काढले. (Indonesia Landslide) आणखी तीन वर्षांच्या मुलीसह इतर तिघांचा शोध सुरू आहे. असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी सांगितले. (Indonesia Landslide)
हे पहा –
Join Our WhatsApp Community