इंडोनेशियात मंगळवारी (९ जानेवारी) ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) च्या मते, भूकंपाचा केंद्रबिंदू ८० किमी खोलीवर होता.तर भारतीय वेळेनुसारपहाटे २.१८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. (Earthquake Indonesia)
इंडोनेशियातील तालौद बेटावर भूकंपाचे धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने (यू. एस. जी. एस.) दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात गुरुवारी इंडोनेशियाच्या बलाई पुंगुटमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. (Earthquake Indonesia)
Earthquake of Magnitude:6.7, Occurred on 09-01-2024, 02:18:47 IST, Lat: 4.75 & Long: 126.38, Depth: 80 Km ,Location: Talaud Islands,Indonesia for more information Download the BhooKamp App https://t.co/Ughl0I9JG3 @Indiametdept @ndmaindia @Dr_Mishra1966 @KirenRijiju @Ravi_MoES
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) January 8, 2024
इंडोनेशियामध्ये ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. इंडोनेशियामध्ये भूकंप होणे सामान्य आहे. याचे मुख्य भौगोलिक कारण आहे.कारण इंडोनेशिया हे पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायरवर वसलेले आहे, त्यामुळे तेथे सतत भूकंप होत असतात. रिंग ऑफ फायर पॅसिफिक, कोकोस, भारतीय-ऑस्ट्रेलियन, जुआन डी फुका, नाझका, उत्तर अमेरिकन आणि फिलीपीन टेक्टोनिक प्लेट्सला जोडते. त्यामुळे इंडोनेशियामध्ये भूकंप होणे सामान्य आहे. याचे मुख्य कारण भौगोलिक स्थान आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community