मध्य प्रदेशमधील इंदूरच्या बेलेश्वर महादेव मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याची मोठी दुर्घटना रामनवमीच्या दिवशी घडली. या दुर्घटनेतील सध्या मृत्यू आकडा हा वाढताना दिसत आहे. आतापर्यंत विहिरीत पडून ३५ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाल्याचे समोर येत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
इंदूर जिल्हाधिकारी डॉ. इलियाराजा टी यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, १८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आला असून यापैकी २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३५ जणांना मृत्यू झाला आहे. अजूनही एका व्यक्तीला शोध घेतला जात आहे. लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरफचे पथक शोध आणि बचाव कार्य करत आहे.
दरम्यान शुक्रवारी, सकाळी मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी सर्व जखमींची विचारपूस केली.
https://twitter.com/AHindinews/status/1641653493261037569?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1641653493261037569%7Ctwgr%5Eb72c5e019eee0eaad8ac6ef727520a83f2d52cfe%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fmadhya-pradesh%2Fstory-mp-indore-beleshwar-mahadev-jhulelal-temple-stepwell-collapse-death-toll-rises-live-updates-7970935.html
नेमकी घटना काय?
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरमधील बेलेश्वर महादेव मंदिरात रामनवमीनिमित्ताने हवन कार्यक्रम सुरू होता. यामध्ये सामिल होण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. सर्व पूजा आणि आरती करत होते यादरम्यान मंदिरात असलेल्या प्राचीन विहिरीवरील छत कोसळले. ४० फूट या खोल विहिरीत चार ते पाच फूट पाणी होते. हे मंदिर सुमारे ६० वर्षे जुने आहे.
(हेही वाचा – ‘वंदे भारत’वर दगड फेकणार्यांना होणार ५ वर्षांचा तुरुंगवास)
Join Our WhatsApp Community