गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेचे उड्डाण होण्याची प्रतीक्षा मागील गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील नागरिकांना होती. त्याचीच पूर्तता आता झाली असून रविवार 13 मार्च पासून प्रवासी विमान वाहतुकीचे टेक-ऑफ झाले आहे.
केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मध्य प्रदेशातून इंदौर येथून हिरवा झेंडा दाखवून विमान सेवेचा प्रारंभ केला. गोंदिया-इंदौर-हैद्राबाद या सेवेला नियमित प्रारंभ झाल्याने जिल्हावासीयांच्या स्वप्नांची पूर्तता झाली आहे.
(हेही वाचाः ‘या’ देशाने एकाच दिवशी दिली 81 जणांना फाशी! काय आहे कारण?)
इंदौर में आज इंदौर-गोंदिया-हैदराबाद सेक्टर की सीधी विमान सेवा का शुभारंभ किया। इससे इन सभी जगह के नागरिकों को आवागमन की सुगमता के साथ ही व्यवसायिक लाभ भी होगा।
1/3 pic.twitter.com/PPdr7q77LX— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) March 13, 2022
उड्डाण योजनेंतर्गत सेवा
गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळाची उभारणी ब्रिटिश सरकारने दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 1942-43 मध्ये केली होती. त्यानंतर 2005 मध्ये तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या विमानतळाचे आधुनिकीकरण करत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ सुरू केले. आता तब्बल 79 वर्षांच्या कालावधीनंतर केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवेस प्रारंभ झाला आहे.
(हेही वाचाः मध्य रेल्वे ‘अशी’ होतेय मालामाल!)
या राज्यातील प्रवाशांना होणार फायदा
फ्लायबिग कंपनीचे प्रवासी विमान इंदौर विमानतळावरून सकाळी 9.30 वाजता सुटले आणि गोंदिया विमानतळावर सकाळी 10.45 वाजता पोहोचले. तर हैदराबादसाठी 1 वाजता उड्डाण भरले. त्यानंतर सोमवारपासून नियमित वेळापत्रकानुसार इंदौर- गोंदिया-हैद्रबाद अशी विमान सेवा सुरू राहणार आहे. विमान सेवेचा लाभ महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील प्रवाशांना सुद्धा होणार आहे. शेतीविषयक मालाची वाहतूक करण्यास या सेवेची भविष्यात मदत होणार आहे.
Join Our WhatsApp Community