Love Jihad : हिंदू तरुणीला फसवून लैंगिक आत्याचारानंतर धर्मांतरास भाग पाडणारा नराधम अमन गजाआड  

इंदूरमध्ये लव्ह जिहादचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. जिथे त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने एका हिंदू मुलीवर बलात्कार तर केलाच, पण तिच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबावही टाकला.

365

मिनी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये (Indore) लव्ह जिहादचे (Love Jihad) एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. एका मॅनेजमेंट कंपनीत (event Management कंपनी) काम करणाऱ्या अमन नावाच्या आरोपी तरुणाने आधी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर धर्मांतरासाठी दबाव टाकला, अशी तक्रार एका २१ वर्षीय (21 years old Reped Girl) तरुणीने पोलीस ठाण्यात केली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आरोपी अमनला (Aman) अटक केली आहे. हे संपूर्ण प्रकरण इंदौर तुकोगंज (Indore Tukoganj Police station) पोलीस ठाणे परिसरातील आहे. (Love Jihad)

जबरदस्तीने शरीर संबंध 

तरुणीने तक्रारीत पोलिसांना सांगितले की, ती इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये (Event Management) काम करते. येथे पीडित तरुणीची अमनशी सुमारे २ वर्षांपूर्वी ओळख झाली. मैत्रीनंतर या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि जवळपास २ वर्षांनी दोघे वेगळे झाले. पीडितेने सांगितले की, दोघांचे दोन महिन्यांपूर्वी पॅचअप झाले होते, त्यानंतर अमनने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. (Love Jihad)

(हेही वाचा – PM Narendra Modi : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाचा अवमान केला

आरोपी गजाआड 

दरम्यान, यावेळी अमनने मला लग्न करायचे असल्याचे सांगितले. त्या बदल्यात त्याने धर्मांतराची (Cast conversion) अट घातली आणि त्याला धर्म बदलावा लागेल असे सांगितले. पीडितेने नकार दिला असता, तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. याला कंटाळून पीडितेने पोलिसांत तक्रार केली. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुकोगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी जितेंद्र यादव यांनी सांगितले की, आरोपी अमनला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा इव्हेंट मॅनेजर असून तरुणीही हेच काम करायची. आरोपीविरुद्ध धमकी, बलात्कार (Indore Rape case) आणि मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. (Love Jihad )

( हेही वाचा – PM Narendra Modi : काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपीकडून जम्मू-काश्मीरचे नुकसान; पंतप्रधान मोदी यांचा आरोप )

इंदौरमध्ये चार दिवसात दुसरी घटणी  

लव्ह जिहादची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, एका हिंदू महिलेने इंदौरच्या कानडिया पोलीस स्टेशन परिसरात तक्रार दाखल केली आहे की, तिचा विवाह १६ वर्षांपूर्वी मुस्लिम समाजातील सादिक नावाच्या तरुणाशी झाला होता. लग्नानंतर दोघांना चार मुले असून दोघेही गेल्या ३ वर्षांपासून वेगळे राहत होते. त्यानंतरही सादिक महिलेच्या घरी येऊन तिला व मुलांना मारहाण करत होता. तिच्याकडून पैसे घेण्यासोबतच तो महिलेवर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकत होता. यामुळे त्रासलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Love Jihad)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.