Indrayani River Pollution : पवित्र इंद्रायणी नदी कि हिमनदी; प्रशासनाविषयी व्यक्त होतोय संताप

गेल्या अनेक वर्षांपासून अशा कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी वारकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. तरीदेखील प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर जलचर प्राण्यांचे देखील जीव यामध्ये गेले असल्याचे समोर आले आहे.

156
Indrayani River Pollution : पवित्र इंद्रायणी नदी कि हिमनदी; प्रशासनाविषयी व्यक्त होतोय संताप
Indrayani River Pollution : पवित्र इंद्रायणी नदी कि हिमनदी; प्रशासनाविषयी व्यक्त होतोय संताप

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीमधील पवित्र मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीला हिमनदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. (Indrayani River Pollution) या नदीमध्ये लाखो वारकरी दरवर्षी स्नान करून नदीतील पाणी अमृत समजून पित असतात. असे असताना देखील आसपासच्या कंपन्यांनी या नदीत केमिकलयुक्त पाणी सोडल्याने नदीवर फेस तयार झाला आहे.

प्रशासन कधी जागे होणार

गेल्या अनेक वर्षांपासून अशा कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी वारकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. तरीदेखील प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर जलचर प्राण्यांचे देखील जीव यामध्ये गेले असल्याचे समोर आले आहे. प्रशासन कधी जागे होणार हाच प्रश्न उपस्थित होत आहे. (Indrayani River Pollution)

(हेही वाचा – Israel Hamas War : गाझामधील 3 रुग्णालयांवर इस्रायली सैन्याकडून हल्ला)

आळंदीमधील पवित्र इंद्रायणी नदीकाठी शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीत पावसाच्या पाण्याबरोबर केमिकलयुक्त फेसांचे ढग आज संध्याकाळी नदीतून घाटावर आले आहेत.

दरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये औद्योगिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीत प्रदूषण पसरत आहे. या प्रदूषणामुळे नदीकाठावर रहाणाऱ्या अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. (Indrayani River Pollution)

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेली देवाच्या आळंदीतील व देहूतील इंद्रायणी नदी वारकरी सांप्रदायासाठी पवित्र मानली जाते. त्यामुळे लाखो भाविक आळंदी आणि देहूला दर्शनासाठी येत असतात. संजीवन समाधी सोहळा, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला या इंद्रायणीच्या घाटावर लाखो वारकरी येत असतात.

(हेही वाचा – Mumbra Thane Shivsena : ठाण्यात राजकारण तापले; उद्धव ठाकरे ‘या’ शाखेची करणार पाहणी)

…तर वारकऱ्यांच्या जीवाला धोका

वारकऱ्यांसाठी या नदीचं पाणी तीर्थासमान आहे. अनेक वारकरी या नदीत स्थान करतात शिवाय तीर्थ म्हणून नदीचं पाणी पितात. त्यामुळे ही नदी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे.

नदीतील प्रदूषण वाढत राहिलं, तर अनेक वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय मोठ्या प्रमाणात त्वचा रोग होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक वारकऱ्यांकडून व आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने नदी स्वच्छ ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

महिन्यावर येऊन ठेपलेल्या कार्तिकी यात्रेसाठी लाखो वारकरी भाविक आळंदीत येत असतात, त्यामुळे इंद्रायणी नदीत स्नान केल्यावर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. (Indrayani River Pollution)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.