Uday Samant : बचत गट, स्टार्टअप्ससारख्या उद्योगांना व्यापार वाढीस कायमस्वरुपी व्यासपीठ उपलब्ध करणार – उद्योग मंत्री उदय सामंत

135

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र राज्य दालनाची उभारणी राज्यासाठी व देशासाठी अतिशय महत्वाची आहे. राजधानीत अशा मोठ्या महत्वाच्या मेळाव्याने राज्यातील स्टार्टअप्स व बचत गट तसेच एक जिल्हा एक उत्पाद सारख्या व्यापारांना चालना मिळेल व त्यांना कायमस्वरुपी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी 42व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयातील महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटना प्रसंगी केले.

राजधानीस्थित प्रगती मैदान येथे 42व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची आज पासून सुरुवात झाली. या मेळ्याचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते झाले. या मेळ्यात उभारला गेलेल्या महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिषा वर्मा, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र कुशवाह, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादम व महाव्यवस्थापक विजय कपाटे उपस्थित होते.

महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करण्यापूर्वी उद्योग मंत्री सामंत (Uday Samant) यांनी महाराष्ट्र सदन येथे पत्रकार परिषद घेतली व आंतरराष्ट्रीय मेळ्यात महाराष्ट्र दालनाच्या उभारणी विषयी तसेच सहभागी झालेल्या स्टॉल्स बद्दल माहिती दिली. यावेळी सांगताना, महाराष्ट्र दालनाची उभारणी व सजावट, प्रथमताच सर जे.जे स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केले असल्याचे माहिती दिली. तसेच  महाराष्ट्र दालनात सहभागी झालेल्या सर्व कारागीरांची राहण्याची सोय  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शासनामार्फत केली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील स्टार्टअप्सला गती देण्याचे धोरण, एक जिल्हा एक उत्पादन योजना, गुंतवणूक आणि व्यापाराला चालना देणे, बचत गटांना प्रोत्साहन देणे व यासाठी सरकारकडून उचललेल्या सर्व आवश्यक पाऊलांची माहिती सामंत (Uday Samant) यांनी प्रसार माध्यमांना यावेळी दिली. तद्नंतर प्रगती मैदान येथे त्यांनी महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन केले व दालनात सहभागी झालेल्या सर्व स्टॉल्सना भेट देऊन, त्यांच्या उत्पादनाबाबती माहिती उत्सुकतेने जाणून घेतली.

(हेही वाचा Muslim : अहमदनगरमध्ये धर्मांध मुसलमानांचा हिंसाचार; श्री कानिफनाथ समाधी मंदिरात भजनी मंडळाला मारहाण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.