राज्यात २० हजार कोटींची गुंतवणूक येणार; उद्योग विभागाचा रिन्यू पॉवर सोबत सामंजस्य करार

235
राज्यात २० हजार कोटींची गुंतवणूक येणार; उद्योग विभागाचा रिन्यू पॉवर सोबत सामंजस्य करार
राज्यात २० हजार कोटींची गुंतवणूक येणार; उद्योग विभागाचा रिन्यू पॉवर सोबत सामंजस्य करार

गेल्या काही महिन्यांपासून राज्याचा उद्योगवाढीचा आलेख उंचावत आहे. शुक्रवारी उद्योग विभागाने मे. रिन्यू पॉवर लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार केला. त्याअंतर्गत राज्यात २० हजार कोटींची गुंतवणूक येणार असून, दहा हजार रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे, उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण आहे. नविनीकरण (रिन्यूएबल) उर्जा क्षेत्रात उद्योग वाढीसाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृहावर शुक्रवारी मे. रिन्यू पॉवर लि. आणि उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि रिन्यू पॉवर प्रा. लि. यांच्यावतीने डॉ. अमित पैठणकर उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक मोठे प्रकल्प येत आहेत. इथे आलेले अनेक प्रकल्प अल्पावधीतच मोठे झाले आहेत. कारण उद्योग वाढीसाठी लागणारे पूरक वातावरण राज्यात उपलब्ध आहे. आर्थिक परिस्थिती कोविड काळातही स्थिर होती. रिन्यू पॉवर या कंपनीचा प्रस्तावित प्रकल्प हा नागपूरात येत असल्याने विशेष सहकार्य करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा – PM Narendra Modi : लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी पुन्हा नंबर वन)

नागपुरात प्रकल्प उभारणार

– दिल्लीस्थित मे. रिन्यू पॉवर लि. ही कंपनी महाराष्ट्रात १० गिगावॅट मेटाल्युर्जिकल ग्रेड सिलिका, १० गिगावॅट पॉलिसिलीकॉन, ६ गिगावॅट इनगॉट/वेफर निर्मिती सुविधा आणि १ गिगावॅट मॉड्युल निर्मितीची सुविधा नवीकरणीय ऊर्जा ब्लॉकसह एकात्मिक प्रकल्प स्थापित करणार आहे.

– हा प्रकल्प नागपूर येथे ५०० एकर जागेवर उभारण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्तावित प्रकल्पात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ८ हजार ते १० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्प उभारल्यानंतर प्रकल्पाशी संबंधित असलेल्या उद्योगांच्या (Ancillary Unit) माध्यमातून २ हजार कोटींची अतिरिक्त गुंतवणूक होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.