Inequality in India : ७० टक्के भारतीयांना वाटतं, असमानतेमुळे त्यांच्यावर अन्याय होतो

Inequality in India : प्यु रिसर्च ही जागतिक स्तरावर सर्वेक्षण करणारी संस्था आहे.

41
Inequality in India : ७० टक्के भारतीयांना वाटतं, असमानतेमुळे त्यांच्यावर अन्याय होतो
  • ऋजुता लुकतुके

फक्त भारतातच नाही तर जगभरातील लोकांनी असमानता ही सगळ्यात मोठी समस्या असल्याचं मत व्यक्त केलं आहे. पण, भारतीयांमध्ये असं मानणाऱ्या लोकांचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे ७० टक्के आहे. प्यु या जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थेनं दरवर्षीप्रमाणे आपला सर्वेक्षण अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे आणि त्यातून भारतासाठी काही धक्कादायक निष्कर्ष निघाले आहेत. प्यु संस्थेनं जगभरात ३६ देशांमध्ये हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात ५४% लोकांनी मान्य केले की, श्रीमंत-गरीबातील वाढती दरी त्यांच्या देशातील एक मोठी समस्या आहे. दुसरीकडे, ३०% लोकांनी याला मध्यम स्वरुपाची समस्या असं म्हटलं आहे. भारतात मात्र ६४% भारतीयांनी श्रीमंत-गरीबातील वाढते अंतर ही सगळ्यात मोठी समस्या असल्याचं म्हटलं आहे. (Inequality in India)

सर्वेक्षणानुसार, १० पैकी ७ भारतीय धार्मिक आणि जातीय भेदभावाला एक मोठी समस्या मानतात. दुसरीकडे, ८०% भारतीय मानतात की, श्रीमंतांचा राजकीय प्रभाव आर्थिक असमानता वाढवण्यामागचे मोठे कारण आहे. आर्थिक असमानतेच्या कारणांमध्ये भारतीय शिक्षण प्रणाली आणि तंत्रज्ञान प्रगतीलाही दोषी ठरवतात. ७२% भारतीयांनी शिक्षण प्रणालीला आर्थिक असमानता कारण मानले. ७३% भारतीयांनी मान्य केले की, ऑटोमेशन असमानतेला प्रोत्साहन देत आहे. हा आकडा जागतिक सरासरीपेक्षा(६३%) जास्त आहे. (Inequality in India)

(हेही वाचा – मुंबईत ‘हाउसिंग जिहाद’ चा कट?; Sanjay Nirupam यांची सरकारकडे चौकशीची मागणी)

उच्च उत्पन्नाच्या देशांव्यतिरिक्त दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियातील देश, उदा. भारत, बांगलादेश आणि इंडोनेशियामध्ये लोक आपल्या मुलांच्या आर्थिक भविष्याबाबत आशावादी आहेत. सर्वेक्षणात उच्च उत्पन्नाचे देश उदा. अमेरिका, जपान आणि फ्रान्समध्ये लोकांनी आर्थिक भविष्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. येथील लोक मानतात की, आपल्या आई-वडिलांच्या तुलनेत भविष्यात आर्थिकदृष्ट्या वाईट स्थितीत असू. ५७% लोकांनुसार, पुढील पीढी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल. ही भीती उच्च उत्पन्नाच्या देशात आहे. (Inequality in India)

प्यू रिसर्च सेंटरने ३६ देशांतील ४१,५०३ लोकांशी चर्चा केली. सर्वेक्षणात आढळले की, देश आपल्या आर्थिक व्यवस्थेत मोठे बदल घडवू इच्छितो. जागतिक स्तरावर ६६% लोक मानतात की, सध्याची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे बदलणे गरजेचे आहे. भारतामध्येही ६६% लोक या विचाराशी सहमत आहेत. जगभरातील लोक आपल्या अर्थव्यवस्थांमध्ये सुधारणेची मागणी करतात. (Inequality in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.