मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरांत मोठी वाढ करण्यात आली आहे. कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात 104 रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. ही वाढ घरगुती सिलिंडरच्या किंमतीत करण्यात आली नसून, ती कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत करण्यात आली आहे.
सामान्यांना दिलासा
या दरवाढीनंतर दिल्लीत 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर 102.50 रुपयांनी वाढून 2 हजार 355 रुपये प्रति सिलिंडर झाले. यापूर्वी 1 एप्रिल रोजी कमर्शिअल सिलिंडरचे दर 268.50 रुपयांनी वाढले होते. घरगुती गॅसच्या किमतीत वाढ न झाल्याने सामान्यांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. दिल्लीत विना अनुदानीत 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे दर 949.50 रुपये झाले आहेत. तर कोलकात्याला गॅस सिलिंडरचे दर 976 रुपये आहेत.
( हेही वाचा: गिरणी कामगारांचा घरासाठी संघर्ष सुरूच! )
असे आहेत नवे दर
मुंबईत विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 949.50 रुपये आणि चेन्नईत ती 965.5 रुपये इतकी आहे. तर लखनौ आणि पाटण्यात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत अनुक्रमे 987.50 रुपये आणि 1039.50 रुपये इतकी आहे. इंडियन ऑइलने आपल्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत 104 रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर कोलकात्यात 19 किलोच्या गॅस सिलिंडरचे दर 104 रुपयांनी 2 हजार 455 रुपयांवर पोहोचले. यापूर्वी हे दर 2 हजार 351.5 रुपये होते.