वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चटका; LPG गॅसच्या दरात 25 रुपयांची वाढ, जाणून घ्या नवे दर

119

एकीकडे देशातील जनता नवर्षाचे स्वागत करत असताना दुसरीकडे मात्र त्यांना महागाईचा चटका बसला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वेगाने दरवाढ करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात 24 ते 25.5 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी चारवेळा घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. मात्र, जुलै 2022 नंतर सरकारने कोणतीही दरवाढ केलेली नाही.

( हेही वाचा: मुंबईच्या हवेचा दर्जा कसा आहे? KEM रुग्णालयातील तज्ज्ञ करणार अभ्यास )

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

  • दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 1 हजार 769 रुपये झाले आहेत.
  • कोलकात्यातील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 24 रुपयाने वाढ करण्यात आली असून, कोलकात्यातील गॅस सिलिंडरची किंमत 1 हजार 869 रुपये इतकी झाली आहे.
  • मुंबईतील व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 25.5 पैशांनी महागले आहे. त्यामुळे चेन्नईत आता 1 हजार 917 रुपयाला एक व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणार आहे.

घरगुती गॅसच्या किमतीत वाढ नाही

घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दिल्लीत एक घरगुती गॅस सिलिंडर 1 हजार 53 , कोलकात्यात 1 हजार 79, मुंबईत 1 हजार 52 आणि चेन्नईत 1 हजार 68 रुपयात मिळणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.