देशात सध्या महागाई गगनाला भिडली असताना, सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने त्याचा परिणाम भारतातदेखील झाला आहे. देशात खाद्यतेलाचे दर घसरले आहेत. 15 लिटर तेलाच्या प्रति डब्यामागे दरात 300 ते 700 रुपयांची घसरण झाली आहे. तर किरकोळ बाजरातही प्रति लिटरमागे तेल 20 ते 40 रुपायांनी स्वस्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी तेलाच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र तेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडूनदेखील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
या कारणांमुळे किमती झाल्या कमी?
सरकारने कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात कपात केल्यामुळे तेलाच्या किमती कमी करण्यास कंपन्यांना मदत झाली आहे. मागील काही आठवड्यांपू्र्वी अर्जेंटिना आणि रशिया यासरख्या प्रमुख निर्यातदार देशांनी सूर्यफूल तेलाचा पुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे किमती आणखी कमी होण्यास मदत झाली आहे.
( हेही वाचा: Maharashtra politics: निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार )
हे तेल स्वस्त
- पामतेल 7 ते 8 रुपये
- सूर्यफूल 10 ते 15 रुपये
- सोयाबीन 5 रुपये
Join Our WhatsApp Community