वाढत्या महागाईची झळ आता आईस्क्रीमलाही बसली असून, दरात 5 ते 10 टक्के वाढ झाली आहे. यंदा उन्हाळा कडक असल्यामुळे विक्रीत 2019 च्या तुलनेत मागील तीन महिन्यांत 45 टक्के वाढ झाली. कंपन्यांनी उत्पादनात 30 टक्के वाढ केली. विक्री वाढल्याने, कंपन्यांनी दरात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ केली असून, त्याचा फटका नागरिकांना बसला आहे.
रेस्टाॅरंट, कार्यालये आणि शाळा महाविद्यालये पुन्हा सुरु झाली आहेत. त्यामुळे आईस्क्रीम विक्रीला मोठी चालना मिळाली आहे.
या राज्यांमध्ये अधिक विक्री
यंदा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्यांत सर्वाधिक आईस्क्रीम विक्री झाली आहे.
( हेही वाचा: भारतीय रेल्वे दहशतवाद्यांच्या रडारवर, आयएसआयची स्लीपर सेल्स अॅक्टिव्ह)
11 हजार कोटींची उलाढाल
80 आईस्क्रीम उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणा-या इंडियन आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये आईस्क्रीम उद्योग 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. आधी हा अंदाज नऊ हजार कोटी गृहीत धरण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community