Inflation in India: उपवासाला ना ‘फळे’, ना ‘भगर’

104

श्रावण महिना म्हणजे उपवासाचा महिना. पूर्वापार चालत आलेल्या रुढीनुसार, बहुतेक जण श्रावण महिन्यात उपवास धरतात. साबुदाण्याची खिचडी अथवा वडे, उकडलेली रताळी, फळे असा उपवासाचा आहार ठरलेला आहे. साबुदाणा खिचडी म्हटली की त्यात साबुदाण्यासोबत शेंगदाणे, बटाटे आलेच. भगरही शिजवून खाल्ली जाते. मात्र, सध्या हा दर वाढल्याने, निराहार उपवास पकडावा की काय, असा प्रश्न उपवासकर्त्यांसमोर आहे.

भगर साबुदाण्यापेक्षाही महाग 

साबुदाण्यापेक्षा भगर खाणे भाविक अधिक पसंत करतात. मात्र, सध्या भगर साबुदाण्यापेक्षाही महाग झाले आहे. गुणवत्तेनुसार, भगर 150 ते 160 च्या घरात असल्याने, त्यापेक्षा साबुदाणा कमी किमतीत मिळतो.

( हेही वाचा: अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, ‘या’ दिवशी होऊ शकतो विस्तार )

फळांचे भावही आवाक्याबाहेर 

ज्याप्रमाणे सर्व खाद्यपदार्थांचे भाव इंधन दरवाढीमुळे कडाडले आहेत, त्याचप्रमाणे फळांवरील वाहतूक खर्चही वाढल्याने, फळांचे दरही कडाडले आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.