सर्वसामान्यांना महागाईचा झटका; CNG-PNG च्या दरात वाढ!

90

सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. त्यातच आता केंद्र सरकारने नैसर्गिक गॅसची किंमत तब्बल 40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक गॅसची किंमत 6.1 डाॅलर प्रति एमएमबीटीयू वरुन 8.57 डाॅलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. नवीन दर 1 ऑक्टोबर म्हणजे आजपासून लागू होणार आहेत.

नैसर्गिक गॅसची किंमत 6.1 डाॅलर प्रति एमएमबीटीयू वरुन 8.57 डाॅलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. एप्रिल 2022 मध्ये नैसर्गिक गॅसची किंमत वाढून 6.10 डाॅलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली होती. 1 ऑक्टोबरपासून यामध्ये वाढ करण्यात आली असून, 8.57 डाॅलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. म्हणजेच यामध्ये 40 टक्के वाढ करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये ही वाढ दुप्पट करण्यात आली होती.

( हेही वाचा: ‘बेस्ट’ गिफ्ट! संपूर्ण मुंबईत सुरू होणार ई-बाईक सेवा; बस थांब्यांवरून प्रति किमी फक्त ३ रुपये भाडे )

रशिया- युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे. नैसर्गिक वायूच्या किंमतीत 1 डाॅलरने वाढ झाल्यानंतर सीएनजीच्या दरात साडे चार रुपये प्रतिकिलो इतकी वाढ होते. सीएनजीच्या दरात 12 ते 13 रुपये किलो वाढ होण्याची शक्यता आहे. तर पीएनजीच्या दरातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.