महागाईचा झटका; CNG, PNG च्या दरांत वाढ

154

महागाईचा फटका पुन्हा एकदा मुंबईकरांना बसणार आहे. याचे कारण म्हणजे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार, महानगर गॅसकडून साडे तीन रुपये प्रति किलो सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. तर, पीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ झाली आहे. जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार, 5 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून हे दर लागू होणार आहेत.

मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

देशभारासह राज्यात दिवसेंदिवस महागाईचे प्रमाण वाढले आहे. तुमच्या घरातील गॅस सिलेंडरपासून ते पेट्रोल- डिझेलपर्यंत प्रत्येक बाबतीत दरवाढीचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार, महानगर गॅसकडून साडे तीन रुपये प्रति किलो सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तर, घरगुती पीएनजीच्या दरात दीड रुपये प्रति एससीएमची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यांत एमजीएलने सीएनजी आणि पीएनजी दरात आतापर्यंत अनेकदा वाढ केली आहे. त्यामुळे आता महागाईची झळ सर्वसामान्य मुंबईकरांना सोसावी लागणार आहे. मुंबईत सीएनजीचे वाढलेले दर 89.50 प्रति किलो तर घरगुती पीएनजी दर 54 रुपये प्रति एससीएम असे जाहीर करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत महागाईच्या झळा उसळल्या असून आता पुन्हा एकदा पीएनजी आणि सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.

( हेही वाचा: रेल्वे प्रवाशांना दिलासा; प्लॅटफॉर्म तिकीट दरांत घट )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.