वाढती महागाई आणि घटत्या उत्पन्नामुळे खर्च वाढतो, शिवाय यामुळे बचत कमी होते. महागाईला तोंड देण्यासाठी खर्च कमी करुन बचत करणे आवश्यक आहे. त्यासाठी 50.30.20 हा नियम लावल्यास लाभ होईल. जाणकारांच्या मते, महागाई 2 ते 5 टक्के या सामान्य स्तरापेक्षा जेव्हा जास्त होते. तेव्हा हा नियम आदर्श आहे. सध्या देशात किरकोळ महागाईचा दर 7 टक्क्यांपेक्षा अधिक झालेला आहे.
काय आहे सूत्र?
कर दिल्यानंतर जे उत्पन्न उरेल त्यातला 50 टक्के हिस्सा आवश्यक वस्तूंवर खर्च व्हावा. 30 टक्के हिस्सा आपल्या इच्छापूर्तीसाठी तर कमीत कमी 20 टक्के हिस्सा बचतीच्या स्वरुपात गुंतवायला हवा. रेपो रेटमधील वाढीमुळे ईएमआयसुद्धा वाढले आहेत. अशा प्रसंगी इतर खर्च कमी करुन 20 टक्क्यांपेक्षा अधिक बचत करणे आवश्यक आहे. 50.30.20 चे सूत्र पाळणे कठीण आहे. मात्र, अशक्य अजिबात नाही, हे सूत्र निश्चितच लाभदायक ठरेल.
( हेही वाचा: अंदमानातील सावरकर कोठडीतील इतिहास खरवडून काढला, कोण आहे दोषी? )
Join Our WhatsApp Community