पितृपक्ष सुरु होताच भाजीपाला महागला

पितृपक्ष सुरु होताच भाजीपाल्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. शेवगा शेंगांचे दर एका आठवड्यात दुप्पट झाले आहेत. होलसेल मार्केटमध्ये शेवगा 100 ते 150 रुपयांवर किरकोळ बाजारामध्ये 240 रुपये किलोवर पोहोचला आहे. ढेमसे, वाटाण्याच्या दरांतही वाढ झाली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी 745 वाहनांमधून तब्बल 3 हजार 635 टन भाजीपाल्याची आवक झाली असून, त्यामध्ये 5 लाख 70 हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. गणेशोत्सवामध्ये भाजीपाला स्वस्त झाला होता. पितृपक्ष सुरु होताच भाव पुन्हा वाढू लागले आहेत. एक आठवड्यापूर्वी होलसेल बाजारामध्ये शेवगा शेंग 40 ते 70 रुपये किलो दराने विकली जात होती. सोमवारी हे दर 100 ते 150 रुपये झाले आहेत. किरकोळ बाजारामध्ये शेवगा 200 ते 240 रुपये किलो दराने विकले जात आहे. शेवगा सर्वसामान्य ग्रहाकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. फरसबी, वाटाणा, गवार, टोमॅटो यांचे दरही वाढले आहेत.

( हेही वाचा: दोन्ही मार्गांवर लोकल गाड्या उशिराने; मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनीटे उशिराने )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here