देशभरात गव्हाच्या किमती वाढत असून, निर्यातीवरही बंदी घालण्यात आली आहे. असे असताना सरकार आता गव्हाच्या पिठावरही बंदी घालण्याचा विचार करत आहे, तर तांदळाच्या निर्यातीवरही बंदी येण्याच्या शक्यतेने बांगलादेशने जूनमध्येच मोठ्या प्रमाणात आयात सुरु केली आहे. त्यामुळे तांदळाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
बांगलादेशने तांदूळ आयातीवरील सीमा शुल्क 62.5 टक्क्यांनी कमी केले आहे. त्यामुळे भारतात तांदळाची किंमत पाच दिवसांमध्ये 10 टक्क्यांनी वाढली आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात किमती 4 टक्क्यांपेक्षा अधिक वाढून 360 डाॅलर प्रति टनवर पोहोचल्या आहेत.
( हेही वाचा शिंदे समर्थक 15 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे )
किमती वाढण्याची कारणे …
- सप्टेंबर- ऑक्टोबर ऐवजी बांगलादेशने प्रथमच जूनमध्येच भारतातून तांदूळ आयात करणे सुरु केले आहे.
- भारत गव्हाप्रमाणेच तांदळावरही बंदी घालण्याचा विचार करु शकतो, अशी भीती बांगलादेश आहे.
- बांगलादेशने तांदूळ आयात शुल्कात 37.5 टक्के ची कपात केली असून, यामुळे भारतीय व्यापार मोठ्या प्रमाणात तांदूळ बांगलादेशला निर्यात करत आहेत.