सध्या उकाड्याने महाराष्ट्राची जनता त्रस्त झाली आहे. तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. बाजारभाव वाढत आहेत. त्यामुळे फरसबीसह वाटाण्याचे दर प्रतिकिलो शंभरच्या पुढे गेले असून, टोमॅटो, कारलीचे दरही वाढले आहेत. पण सध्या गवारीचे दर मात्र नियंत्रणात आहेत. इंधनाच्या दरांत झालेल्या विक्रमी वाढीमुळे आधीच सामान्यांचा खिसा रिकामा होत आहे. त्यात आता भाज्यांच्या वाढणा-या दराने सर्वसामान्यांना महागाईची झळ पोहचत आहे.
भाज्यांचे दर कडाडले
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी 592 ट्रक व टेम्पोमधून 2 हजार 718 टन भाजीपाल्याची आवक झाली असून, जवळपास 5 लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये फरसबी 40 ते 60 रुपये किलो दराने विकले जात होते, त्याचे दर 60 ते 100 रुपये झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये फरसबी 40 ते 60 रुपये किलो दराने विकले जात होते, त्याचे दर 60 ते 100 रुपये झाले आहेत.
( हेही वाचा: इंधन करावरुन केंद्र राज्याच्या सुरु असणा-या भांडणात अजित पवारांनी सुचवला तोडगा )
…म्हणून गवार स्वस्त
सध्या आवक कमी होऊ लागल्याने, दर वाढत आहेत. गवार व इतर काही भाज्यांची आवक जास्त असल्यामुळे त्यांचे दर कमी झाल्याचे व्यापारी स्वप्निल घाग यांनी दिली आहे.
एपीएमसी व किरकोळ बाजारातील बाजारभाव
वस्तू | २७ मार्च | २७ एप्रिल | २७ एप्रिल किरकोळ |
बीट | ८ ते १२ | १० ते २० | ४० |
फरसबी | ४० ते ६० | ६० ते १०० | १२० |
फ्लॉवर | ८ ते १२ | १० ते २० | ६० |
कारली | २० ते ३० | २६ ते ३६ | ५० ते ६० |
टोमॅटो | १० ते १४ | १४ ते २२ | ४० ते ५० |
वाटाणा | ३५ ते ५५ | ६० ते ८० |
Join Our WhatsApp Community