Inflation: निवडणुकीच्या निकालापूर्वीच डाळ-तांदूळ आणि पालेभाज्यांच्या किमती वाढल्या, नवीन दरवाढ जाणून घ्या

बाजारात सध्या पॉलिश नसलेल्या आंबेमोहर, इंद्रायणी या तांदळांना सर्वाधिक मागणी आहे.

137
Inflation: निवडणुकीच्या निकालापूर्वीच डाळ-तांदूळ आणि पालेभाज्यांच्या किमती वाढल्या, नवीन दरवाढ जाणून घ्या

लोकसभा निवडणूक -२०२४च्या निकालापूर्वीच भाजीपाल्यासह तांदूळ आणि डाळींच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या महागाईचा फटका बसणार आहे. गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने तांदळाच्या उत्पादनात घट झाली. उत्पादनात घट झाल्याने तांदळाच्या किमती वाढल्या. गेल्या वर्षी साधा तांदूळ साडेचार हजार रुपये क्विंटल दराने विकला जात होता, मात्र हे दर वाढले असून तोच तांदूळ साडेपाच हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. (Inflation)

बाजारात सध्या पॉलिश नसलेल्या आंबेमोहर, इंद्रायणी या तांदळांना सर्वाधिक मागणी आहे, मात्र याच्या उत्पादनातही घट झाल्याने नागरिकांना आवडता तांदूळ खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत, तर चिनोर तांदळाचे दर ६ हजारांहून ७ हजार २०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत. आंबेमोहर तांदूळ ७ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल आहे, तर इंद्रायणी तांदूळ ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल आहे. राज्यात विविध वस्तूंवरील दर वाढत आहेत. त्यातच सर्वसामान्यांच्या घरात आवडीने खाल्ला जाणारा वरण-भातही डाळींच्या किमती वाढल्यामुळे महागला आहे, कारण आता डाळींच्या किमती वाढल्या आहेत. (Inflation)

(हेही वाचा – Pune Porsche Car Accident : पुण्याच्या पोर्स अपघातानंतर मुंबई पोलिसांकडून बार, पबबाहेर पडणाऱ्यांची तपासणी)

डाळीच्या दरात किती रुपयांची वाढ
गेल्या १५ दिवसांमध्ये डाळींच्या किमतीही वाढल्यात. तूरडाळीच्या किमती ४० ते ५० रुपयांनी वाढल्या आहेत. गेल्या महिन्यात तूरडाळीचा भाव १४० ते १४२ रुपये प्रति किलो होता. हे दर आता वाढले असून डाळ १८० ते १९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे, तर हरभरा डाळ ७० ते ७२ किलोवरून थेट ९० ते ९५ रुपये किलोवर पोहचली आहे.

कोथिंबीर, टोमॅटो, श्रावणी घेवडा, पालेभाज्या…
वाढत्या उष्णतेचा फटका शेतीमालाला बसल्याने पालेभाज्या आणि फळ भाज्यांचे भाव वाढले आहेत. आवक कमी झाल्याने सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीची किंमत ५० ते ६० रुपयांवर पोहचली आहे. कोथिंबीर, मेथी, कांदापातीसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झालीय, तर श्रावणी घेवडा तीनशे रुपये झाला असून टोमॅटोही पन्नास रुपयांपर्यंत गेला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.