Inflation Rate : जानेवारीत महागाई दरात घसरण, भाजीपाल्याचे दरही उतरले

जानेवारी महिन्यात महागाई दर ४.३ टक्क्यांवर आला आहे.

60
Inflation Rate : जानेवारीत महागाई दरात घसरण, भाजीपाल्याचे दरही उतरले
Inflation Rate : जानेवारीत महागाई दरात घसरण, भाजीपाल्याचे दरही उतरले
  • ऋजुता लुकतुके

ट्रंप यांची प्रस्तावित शुल्कवाढ आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीत भारताला एक दिलासा मिळाला आहे तो महागाई दर आटोक्यात येण्याचा. सलग दुसऱ्या महिन्यात महागाई दर (Inflation Rate) हा रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) घालून दिलेल्या ५ टक्क्यांच्या मर्यादेच्या आत आहे. जानेवारी महिन्यातील आकडे समोर आले असून यावेळी महागाई दर (Inflation Rate) ४.३ टक्के इतका असल्याचं समोर आलं आहे. फेब्रुवारी महिन्यातच रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) ग्राहकांना रेपोदरात कपातीचा दिलासा दिला आहे. आता जानेवारी आणि फेब्रुवारीत महागाई दर (Inflation Rate) असाच आवाक्यात राहिला तर पुढील पतधोरणातही व्याजदर कपात होऊ शकते.

चांगलं कृषी उत्पादन आणि भाजी-पाल्याची उपलब्धता यामुळे महागाई दर (Inflation Rate) कमी व्हायला मदत झाली आहे. जानेवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. महागाईचा दर ४.३ टक्क्यांवर आला आहे. एप्रिल २०२५ पासून नवं आर्थिक वर्ष सुरु होत आहे. एप्रिल महिन्यात आरबीआयच्या (RBI) पतधोरण विषयक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत महागाईतील घसरणीचा अंदाज घेत रेपो दरामध्ये कपात करण्याचा निर्णय होऊ शकतो. सध्या रेपो दर ६.२५ टक्के इतका आहे.

(हेही वाचा – Donald Trump यांचं पंतप्रधान मोदींना खास गिफ्ट; दिलं ‘हे’ पुस्तक)

जानेवारी महिन्यात भाजीपाल्याच्या दरात घसरण झाल्यानं महागाई घटली आहे. चांगल्या रब्बी हंगामामुळे महागाईचा दर (Inflation Rate) आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

नाईट फ्रँक इंडियाचे राष्ट्रीय संचालक विवेक राठी यांनी आरबीआयनं (RBI) फेब्रुवारीच्या पतधोरण समितीच्या आढावा बैठकीनंतर २५ बेसिस पॉईंटची कपात केली आहे. महागाईच्या दरातील (Inflation Rate) वाढीच्या शक्यतेमुळं आरबीआयनं (RBI) रेपो दरामध्ये कपात केली होती. मात्र, त्यापूर्वीच्या ७ तिमाहीमध्ये रेपो दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नागरिकांची क्रयशक्ती वाढावी यासाठी व्याज दर कपातीचा निर्णय आरबीआयनं (RBI) घेतला होता.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 मध्ये बीसीसीआयचे खेळाडूंसाठी कडक नियम; पत्नी व मुलांना प्रवासातही सोबत ठेवण्यावर निर्बंध)

रायन्सेस प्रायवेट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ संजय कुमार (Sanjay Kumar) यांनी सीपीआय महागाई निर्देशांक ५ टक्क्यांच्या खाली आला आहे, असं म्हटलं. खाद्य पदार्थातील किमती घटल्यानं ही स्थिती पाहायला मिळतेयं. खाद्य पदार्थाच्या किमतीवरील नियंत्रण कायम ठेवून विक्री वाढवण्याचा प्रयत्न आहे. किरकोळ महागाई दर (Inflation Rate) ४ टक्क्यांपर्यंत असल्यानं व्याज दरात कपात शक्य असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

केअरएज रेटिंग्सच्या मुख्य अर्थतज्ज रजनी सिन्हा यांनी चौथ्या तिमाहीत आणि येत्या आर्थिक वर्षात २०२५-२६ मध्ये महागाईचा दर (Inflation Rate) ४.४ ते ४.५ टक्क्यांवर राहणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये २५ बेसिस अंशांनी रेपो दर कमी होऊ शकतात. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा (Sanjay Malhotra) यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये महागाईचा दर (Inflation Rate) वाढल्यानंतर नोव्हेंबर अन् डिसेंबरमध्ये घसरण झाली आहे. जानेवारीत देखील महागाईच्या दरात (Inflation Rate) घसरण झाली आहे. सर्व गोष्टींचा विचार करता २०२४-२५ मध्ये महागाईचा दर ४.८ टक्के राहील. चौथ्या तिमाहीत ४.४ टक्के महागाईचा दर राहू शकतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.