मागच्या काही दिवसांपासून सातत्याने महागाई वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होणारी वाढ सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब आहे. आता महागाईने कळस गाठला आहे. एप्रिलमध्ये खाद्यपदार्थांपासून ते तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईने 8 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, ग्राहत किंमत निर्देशांक आधारित किरकोळ महागाई मार्चमध्ये वाढून 8.79 टक्के झाली आहे. या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण बैठकीनंतर पहिल्या तिमाहीत महागाईचा अंदाज 6.3 टक्के दुस-या 5 टक्के तिस-या 5.4 आणि चौथ्या तिमाहीत 5.1 टक्के इतका वाढवला होता. सलग चौथ्या महिन्यात महागाई दराने रिझर्व्ह बॅंकेने घालून दिलेली 6 टक्केची मर्यादा ओलांडली आहे.
खरेदी थांबवली
वाढवलेल्या महागाईचा भारतातील लोकांच्या खरेदीच्या निर्णयावर परिणाम झाल्याचे ईवायने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. 80 टक्के भारतीय हातातील रक्कम खर्च करण्याऐवजी बचत करण्यावर भर देत असून, केवळ परवडणा-या वस्तू खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.
( हेही वाचा: सोशल मीडियापासून कसे राहाल दूर? )
औद्योगिक उत्पादनात किरकोळ वाढ
देशातील औद्योगिक उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.9 टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये ही वाढ 1.7 टक्के होती, ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी प्रंचड कमी झाली असून, या क्षेत्रात नकारात्मक वाढ दिसून आली आहे.
Join Our WhatsApp Community