सर्दी, खोकला, घशात खवखव; केंद्राने जारी केले निर्देश

164

सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात लोकांना सर्दी, खोकला आणि घशात खवखव यांसारखे आजार होऊ लागले आहेत. त्यावर डॉक्टर सर्रास अँटिबायोटिक देत आहेत. या सर्व प्रकाराबाबत केंद्र सरकारने निर्देश जारी केले आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारइंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर आणि इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आयएमएने यासंदर्भातील म्हटले आहे की, या इनफ्लूएन्झामुळे श्वसनासंबंधित समस्या (respiratory illness) निर्माण होतात. हा इनफ्लूएन्झा ए सबटाइप एचथ्रीएनटू (H3N2) (Influenza subtype A H3N2) प्रकारातील आहे. आयसीएमआरच्या वीआरडीएलएस नवाच्या सर्वेक्षणामध्ये 15 डिसेंबरपासून आतपर्यंत दाखल करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये श्वसनासंदर्भातील संसर्ग झालेले (सार्क) आणि आऊट पेशंट इन्फ्लूएन्झा सारखे H3N3 पद्धतीच्या संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. वायू प्रदुषणामुळे लोकांमध्ये श्वसन संस्थेच्या सुरुवातीच्या भागाला इनफेक्शन होण्याबरोबरच तापाचेही लक्षण दिसून येते.

ही आहेत H3N2 इन्फ्लूएन्झाची लक्षणे 

  • खोकला
  • अस्वस्थ वाटणे
  • उलट्या
  • घशात खवखव
  • अंगदुखी
  • बद्धकोष्ट

(हेही वाचा गड-दुर्ग रक्षण महामोर्च्याचा IMPACT: तीन महिन्यांत स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची होणार स्थापना)

संसर्ग टाळण्यासाठी काय कराल?

नियमितपणे आपले हात पाणी आणि साबणाने धुवा. वरीलपैकी कोणतंही लक्षणं दिसलं तर मास्क वापरणं सुरु करा. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. वारंवार आपल्या तोंडाला आणि नाकाला हात लावू नका. खोकताना, शिंकताना आपल्या नाक आणि तोंड रुमालाने झाका. हायड्रेटेड राहण्यासाठी द्रव्य पदार्थांचं सेवन वाढवा. ताप आणि अंगदुखी वाटत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासिटामॉल खाऊ शकता.

  • हास्तांदोलन करणे टाळा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा.
  • स्वत: औषधांबद्दलचे निर्णय घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • घराबाहेर कोणत्याही ठिकाणी दुसऱ्या व्यक्तींच्या बाजूला बसून जेवतना सुरक्षित अंतर ठेवा.

अॅण्टीबायोटीक्स टाळा

आयएमएच्या डॉक्टरांनी केलेल्या आवहानानुसार असे म्हटले आहे की झालेला संसर्ग हा जिवाणूच्या माध्यमातून झाला आहे की नाही हे समजल्याशिवाय अॅण्टीबायोटीक्स देऊ नये. यामुळे अधिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. ताप, खोकला, घशातील खवखव आणि अंगदुखीच्या बऱ्याच प्रकरणे ही इन्फ्लूएन्झाची असतात. ज्यामध्ये अॅण्टीबायोटीक्स औषधांची गरज नसते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.