महायुतीचा लोकसभेचा जागावाटपाचा फॉर्म्युला (Loksabha Election 2024) ठरला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप २६ जागा लढवणार, तर शिंदे- अजित पवार गट मिळून २२ जागांवर निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. २०१९ मध्ये भाजपने लोकसभेच्या २५ जागा लढवल्या होत्या आणि तत्कालिन शेवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी भाजपने २३ आणि सेनेने १८ जागा जिंकल्या होत्या, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा – Veermata Jijabai Bhosle Park: प्राणीसंग्रहालयात पेंग्विनची संख्या वाढली, प्रशासनाकडून जागावाढीचा विचार)
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये कुणाला किती जागा मिळणार, याबाबत तर्क लढवले जात होते. आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच खुलासा केला आहे. शिवसेना आणि अजित पवार गटाला हे जागावाटप मान्य असेल का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community