
जागतिक बाजारपेठेत भारताला तिसर्या क्रमांकावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने आयोजित केलेल्या सिनर्जी समिटसारख्या उपक्रमांनी चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि जस्ट फॉर एन्टरप्रेनर (जे फॉर ई) यांच्या वतीने पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित सिनर्जी समिटच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा सन्मान करण्यात आला.
(हेही वाचा – कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग; CM Devendra Fadnavis यांचे विधान)
या वेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सेक्रेटरी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, कुलगुरु प्रा. डॉ. एन. जे. पवार, जे फॉर ई संस्थेचे संस्थापक विशाल मेठी, बिजनेस सेलच्या प्रमुख अमृता देवगावकर, डॉ. जे. एस. भवाळकर, डॉ. संजीव चतुर्वेदी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या ग्लोबल स्कूलचे सल्लागार प्रा. सचिन वेर्णेकर आदी उपस्थित होते.
300 पेक्षा अधिक आंत्रप्रेनर्स आणि गुंतवणूकदारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच, 60 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्टार्टअप आयडियाचे सादरीकरण केले. त्यासाठी काही उद्योजकांनी आवश्यक गुंतवणूक करण्याची तयारीही दर्शविली आहे. (Chandrakant Patil)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community