कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राजकीय पक्षांचा पुढाकार; ६५० गाड्यांची मागणी

81

गणेशोत्वासाला मुंबई-पुण्यातून चाकरमानी वर्ग मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होतो. एसटी महामंडळाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन २ हजार ५०० गाड्या सोडण्याची घोषणा केली होती. तर दुसरीकडे काही राजकीय पक्षांनीही मुंबई, ठाण्यातून कोकणात जाण्यासाठी ६५० गाड्यांच्या आरक्षणाची मागणी केली आहे. त्यापैकी ५०० गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.

( हेही वाचा : नवी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई : दारुगोळ्यासह 2 हजार जिवंत काडतुसं जप्त; 6 जणांना अटक )

६५० गाड्यांच्या आरक्षणाची मागणी

१ हजार ३०० जादा एसटी गाड्यांचे आरक्षण २५ जूनपासून सुरू झाले आहे. तर कोकणातून परतीच्या प्रवासासाठी ५ ते ११ सप्टेंबरदरम्यान जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. सध्या मुंबई, ठाणे, पालघर येथून कोकणात जाणाऱ्या २ हजार ७५७ गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यापैकी १ हजार २०१ गाड्यांचे गट आरक्षण झाले आहे.

यंदा राजकीय पक्षांनीही मोठ्या प्रमाणात एसटी गाड्यांच्या गट आरक्षणाला सुरूवात केली आहे. शिवसेनेतून ठाण्यातून ४०० गाड्यांचे आणि मनसेने १०० गाड्यांच्या आरक्षणाची मागणी केल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली. तर मुंबईतून भाजपच्या लोकप्रतिनिधींनी १५० गाड्यांची मागणी केली आहे. या गाड्यांचे आरक्षण सुद्धा फुल्ल होत आहे. दक्षिण मुंबईसह, शीव, चेंबूर, मुलुंड, वांद्रे, बोरिवली या भागातून भाजपमार्फत गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.