संपूर्ण राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. गोविंदा रे गोपाळाच्या तालावर अनेक गोविंदा पथक थरावर थर रचून हंडी फोडत आहेत. हाच उत्साह सध्या महाराष्ट्रभरात असून, मुंबईतील अनेक ठिकाणी राजकीय पक्षाकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवाला अनेक सेलिब्रेंटीनी देखील हजेरी लावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जन्माष्टमीनिमित्त मंगळवारी (२७ ऑगस्ट) रोजी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमादरम्यान मुंबई (Mumbai) आणि उपनगरात (Mumbai suburbs) सायंकाळीपर्यंत ६३ गोविंदा जखमी झाले आहेत. पीडितांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर काही जखमी गोविंदांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(हेही वाचा – MSEB : ‘मराविम’ ऑनलाइन माहितीच्या अधिकारात समाविष्ट का नाही? कर्मचारी-अभियंत्यांचा संताप)
रुग्णालयाचे नाव व जखमींवर उपचार
- सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये ०३ जखमी गोविंदांची नोंद. एक रुग्णालयात दाखल असून एकावर उपचार सुरु असून, १ गोविंदाला डिस्चार्ज देण्यात आलं आहे.
- जेजे रुग्णालयातून १ गोविंदाला डिस्चार्ज देण्यात आलं आहे.
- जीटी हॉस्पिटलमध्ये १ गोविंदा जखमी असून, त्यावर उपचार सुरू आहेत.
- पोद्दार हॉस्पिटलमध्ये १ गोविंदा जखमी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला.
- केईएम हॉस्पिटलमध्ये ८ जखमी गोविंदाना दाखल करण्यात आलं होतं. एका गोविंदाला रुग्णालयात दाखल केलं असून ७ रुग्णांना उपचार करुन सोडण्यात आलं.
- नायर हॉस्पिटलमध्ये ५ जखमी गोविंदावर उपचार करण्यात आले.
- सायन रुग्णालयात ७ जखमी गोविंदावर उपचार सुरु आहेत.
- राजावाडी हॉस्पिटलमध्ये ०३ जखमी गोविंदांची नोंद. दोन गोविंदा रुग्णालयात दाखल असून, एकावर उपचार सुरु असून, १ गोविंदाला डिस्चार्ज देण्यात आलं आहे.
- एमटी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये १ जखमी गोविंदा दाखल.
- कुर्ला भाभा हॉस्पिटलमध्ये २ गोविंदा जखमी झाले आहेत.
- शताब्दी हॉस्पिटलमध्ये २ गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
- वांद्रे भाभा हॉस्पिटलमध्ये ३ जखमी गोविंदांवर उपचार सुरु आहेत.
- ट्रॉमा केअर रुग्णालय ४ गोविंदांवर उपचार सुरू आहेत.
- व्ही. एन. देसाई रुग्णालयात ४ गोविंदावर उपचार सुरू आहेत.
- एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयात १ गोविंदाला डिस्चार्ज देण्यात आलं आहे.
- बी. डी. बी. ए. रुग्णालय ७ रुग्ण दाखल त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
- लीलावती रुग्णालयात १ गोविंदा दाखल त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही पाहा –