Atul Save : मुंबईच्या डोंगरीतील उपकरप्राप्त इमारत दुरुस्तीची चौकशी; अतुल सावे यांची घोषणा

म्हाडाला अर्थसंकल्पात ७९ कोटी रूपये, पावसाळी अधिवेशनात ९५ कोटी रूपये आणि हिवाळी अधिवेशनात ९८ कोटी रुपये निधी मिळाला आहे.

330
मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार; Atul Save यांचे प्रतिपादन

मुंबईतील डोंगरी भागातील उपकरप्राप्त इमारत ६-६अ च्या दुरुस्तीचे काम न करता म्हाडाने बिले अदा केले असल्यास त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी मंगळवारी (१९ डिसेंबर) विधानसभेत केली. (Atul Save)

म्हाडाकडे निधी उपलब्ध

काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी या उपकरप्राप्त इमारतीची २०१८ मध्ये दुरुस्ती न करता म्हाडाने कामाची बिले अदा केल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सावे (Atul Save) म्हणाले, या दोन इमारतींच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. म्हाडाकडे निधी उपलब्ध आहे. रहिवाश्यांनी वास्तुविशारद (Architect) सूचवावा, त्याप्रमाणे दुरुस्तीचे काम केले जाईल. फातिमा मंझील इमारतीबाबतही वास्तुशास्त्रज्ञ सुचवून त्यानुसार काम केले जाईल. तसेच डोंगरी भागातील वार्डात मागच्या पाच वर्षात झालेल्या दुरुस्ती कामाचे अहवाल मागवले जाईल, असेही सावे (Atul Save) यांनी सांगितले. (Atul Save)

(हेही वाचा – BJP-NCP Alliance : ‘राष्ट्रवादी’ची भाजपशी ‘राजकीय तडजोड’, पण ‘वैचारिक दुरावा’)

९८ कोटी रुपये निधी

यापूर्वीच म्हाडाला अर्थसंकल्पात ७९ कोटी रूपये, पावसाळी अधिवेशनात ९५ कोटी रूपये आणि हिवाळी अधिवेशनात ९८ कोटी रुपये निधी मिळाला आहे. विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही. म्हाडातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. जाहिराती काढण्यात आल्या आहेत. लवकरच रिक्त पदे भरले जातील, असेही अतुल सावे (Atul Save) यांनी यावेळी स्पष्ट केले. (Atul Save)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.