नोट मोजणी मशीनची दर तीन महिन्यांनी तपासणी करा; RBIचे निर्देश

भारतीय अर्थव्यवस्थेत 2016 नंतर आलेल्या सर्व चलनातील नोटांचा दर्जा उत्तम राहील, याची दक्षता घेण्यासाठी बॅंकांतील नोटा मोजणी मशीनमध्ये काहीसे बदल झाले आहेत. त्यामुळे या मशीनची अचूकता आणि कार्यक्षमता यांची दर तीन महिन्यांनी तपासणी करण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांना दिले आहेत.

नोटबंदीनंतर भारतीय चलनात नव्या नोटा जारी करण्यात आल्या. आधीच्या नोटांच्या तुलनेत या नव्या नोटांच्या दर्जामध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या. तसेच, नव्या नोटांकरिता नोटा मोजण्याच्या मशीनमध्येही काही बदल करण्यात आले. प्रामुख्याने नोटांची सत्यता पडताळतानाच त्या व्यवहारासाठी योग्य आहेत की नाही याची चाचपणी या मशीनध्ये होते.

( हेही वाचा: यंदा अकरावी प्रवेशासाठी ४९ हजार जागा वाढल्या! )

या नोट्या स्वीकारल्या जाणार नाहीत

मात्र, या नव्या नोटांमध्येदेखील बनावट नोटांचे प्रमाण वाढत आहे. तसेच, खराब होण्याचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मशीनची योग्य ती काळजी घेण्यात यावी आणि बॅंकेतून जाणारी किंवा येणारी प्रत्येक नोट काळजीपूर्वक तपासावी, असे निर्देश शिखर बॅंकेने दिले आहेत. दरम्यान, नव्या नोटा जेव्हा बाजारात आल्या तेव्हाच त्यावर कोणत्याही प्रकारे पेन अथवा पेन्सीलने केलेल्या खुणा नकोत अथवा काही लिहिलेले नको, असे असल्यास त्या नोटा स्वीकराल्या जाणार नाहीत, हे रिझर्व्ह बॅंकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here