जहाजातून तेल गळती; कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरमधून सिंधुदुर्ग ते गोवा किनारपट्टीची रेकी

137

अपघातग्रस्त ‘पार्थ’ मधून सुरु झालेल्या तेल गळतीबाबत कोस्ट गार्डच्या ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरव्दारे सिंधुदुर्ग ते गोवा रेकी करण्यात आली. यात ८ सागरी मैलांवर तेलाचे तवंग दिसले. समुद्र किनाऱ्यावर तेल आल्यास करावयाच्या उपाय ओजनेसाठी उद्या शुक्रवार २३ सप्टेंबर रोजी मालवण येथे रंगीत तालीमचे आयोजन करण्यात आले आहे. तेल गळतीच्या अनुषंगाने आवश्यक ती पूर्वतयारी प्रशासनामार्फत करण्यात येत असून, किनारे सफाईसाठीचा आवश्यक कृती आराखडा प्रशासनामार्फत तयार करण्यात येत आहे. विविध अशासकीय संस्था, NSS आणि NCC विभागांनी मोठ्या प्रमाणावर स्वयंस्फूर्तीने पुढे येवून आवश्यकता लागल्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

( हेही वाचा : लम्पी आजार : मुंबईत २२०३ गायींचे लसीकरण )

विजयदुर्ग ते देवगड दरम्यान ४० ते ४५ वाव पाण्यात ‘पार्थ’ हे १०१ मी.लांबीचे तेलवाहू जहाज १६ सप्टेंबर २०२२ रोजी अपघातग्रस्त झाले होते. कोस्ट गार्ड रत्नागिरी यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सदर जहाजातून १९ सप्टेंबरला तेल गळतीस प्रारंभ झाला. कोस्ट गार्ड रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार २२ सप्टेंबरला कोस्टगार्डच्या Advance Light Helicopter मधून सिंधुदुर्ग ते गोवा किनारपट्टी भागाची रेकी करण्यात आलेली आहे. तेलाचा तवंग पसरल्यास किनारपट्टीचा कोणता भाग सर्वात जास्त बाधित होणार आहे याची पाहणी करण्यासाठी सदरील रेकी होती. सदरच्या रेकी नुसार ८ सागरी मैलांवर तेलाचे पॅचेस कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरला दिसले आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलेले असून तेल समुद्र किना-यावर आल्यास त्या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारी करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणाना देण्यात आलेल्या आहेत. तसेच तेल किना-यावर वाहून आल्यास करावयाच्या उपाययोजना, किना-याची सफाई, सफाईतून एकत्र केलेल्या टाकावू पदार्थांची विल्हेवाट कशी लावावी या संदर्भाने आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.