दादरच्या फेरीवाल्यांना नियंत्रणात ठेवणाऱ्या निरीक्षकाचे हृदयविकाराने निधन!

दादर पश्चिम परिसरातील परवाना निरीक्षक लक्ष्मीकांत लंकेश्री यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. लंकेश्री यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिथे दाखल केल्यांनतर उपचार सुरू असतानाच त्यांचा  मृत्यू झाला. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. लंकेश्री हे अत्यंत शांत स्वभावाचे म्हणून परिचित होते. शांत आणि मितभाषी असूनही, फेरीवाल्यांमध्ये त्यांची वेगळ्याच प्रकारची दहशत होती.

कोण होते लंकेश्री?

महापालिकेच्या जी-उत्तर विभागाच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाचे निरीक्षक असलेले लंकेश्री हे मागील दोन वर्षांपासून दादर विभागात कार्यरत होते. दादरमधील फेरीवाल्यांवरील कारवाईमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. दादरमधील लॉरी इन्सपेक्टरमध्ये त्यांची अधिक ओळख होती. जी-उत्तर विभाग कार्यालयामध्ये परवाना निरीक्षक म्हणून कार्यरत होण्यापूर्वी त्यांनी गोवंडी, देवनार या एम-पूर्व विभागात सेवा बजावली होती. त्यापूर्वी ते ई-विभागात लिपिक पदावर कार्यरत होते आणि सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात सेवा बजावत होते. तिथून पुढे परीक्षा देत, ते परवाना निरीक्षक बनले होते.

(हेही वाचाः कोरोना रुग्णांचा ताप कमी जास्तच!)

सेवा बजावत असताना हृदयविकाराचा झटका

लंकेश्री यांच्या निधनामुळे दादरमधील फेरीवाल्यांनीही हळहळ व्यक्त केली. १४ एप्रिल रोजी महापालिकेला सुट्टी असली, तरी दादर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे लंकेश्री सकाळी सेवा बजावत असतानाच, अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले. पण तिथे उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here