व्हॉट्सअॅपनंतर आता जगभरात इन्स्टाग्राम हे लोकप्रिय अॅप डाऊन झाले आहे. काही युजर्सचे इन्स्टाग्राम अकाऊंट व्यवस्थित चालू असले तरी अनेकांचे इन्स्टाग्राम डाऊन झाले आहे. याबाबत ट्वीट करत इन्स्टाग्रामने दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅप नंतर लगेचच इन्स्टाग्राम डाऊन झाल्यामुळे युजर्सने सुद्धा मेटा कंपनीचा चांगलाच समाचार घेतला आहे.
इंस्टाग्रामने काय सांगितले
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टाग्रामने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, ‘आम्हाला माहिती आहे की तुमच्यापैकी काहींना तुमचे इंस्टाग्राम अकाउंट ऍक्सेस करण्यात समस्या येत आहेत. आम्ही त्याची चौकशी करत आहोत. गैरसोयीबद्दल क्षमस्व.’
We're aware that some of you are having issues accessing your Instagram account. We're looking into it and apologize for the inconvenience. #instagramdown
— Instagram Comms (@InstagramComms) October 31, 2022
समस्या काय आहे
ट्विटरच्या माध्यमातून इंस्टाग्राम डाऊन होत असल्याच्या तक्रारी लोक करत आहेत. ट्विटरवर #InstagramDown हॅशटॅग देखील ट्रेंड करत आहे. युजर्सच्या तक्रारीनुसार, त्यांना त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. यासोबतच काही युजर्स त्यांची खाती सस्पेन्शन झाल्याच्या तक्रारीही करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि इतर देशांमधील वापरकर्त्यांना लॉगिनसह सर्व्हर कनेक्शनशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे.
युजर्सनी व्हायरल केले भन्नाट मीम्स
All of us coming to twitter to confirm instagram is down #instagramdown pic.twitter.com/DT6BthlNDK
— cesar (@jebaiting) October 31, 2022
Me trying to recover my Instagram account #instagramdown pic.twitter.com/3cOPNCBX2w
— sparsh kanak (@kanak_sparsh) October 31, 2022
Me apologising to my wifi after finding out Instagram is down #instagramdown pic.twitter.com/wk0I5XT91e
— ARVIND RAM (@VodkaTweetz) October 31, 2022
Join Our WhatsApp Community