अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाण पूल प्रकल्पातील रेल्वे भूभागात पहिल्या टप्प्यातील गर्डर सोमवारी मध्यरात्री ४ डिसेंबर २०२३ रोजी काम पूर्ण करण्यात आले. या कामामध्ये गर्डर दोन्ही पियर्सच्या वर योग्य जागी बसवण्यात आले आहेत. हे काम काटेकोरपणे व अचूक करावयाचे असल्याने उर्वरीत टप्प्यातील काम सोमवारी दुसऱ्या दिवशी करण्यात आले. नियोजनाप्रमाणे १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत गोखले पुलाच्या पहिला टप्प्याचे काम पूर्ण होऊन हा पूल अंशतः वाहतुकीकरीता खुला करण्याचे नियोजन असल्याचे पूल विभागाने स्पष्ट केले. (Gokhale Bridge)
येत्या पंधरवड्यात हा गर्डर १४ मीटर उत्तरेला सरकवणे आणि नंतर तो ७.५ मीटर खाली आणणे ही कामे नियोजित करण्यात आली आहेत. यासाठी पश्चिम रेल्वेने उपलब्ध करून दिलेल्या विशेष पॉवर आणि ट्र्रॅफिक ब्लॉकच्या नियोजनानुसार काम चालणार आहे. तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक अशा पद्धतीचे हे काम असून प्रत्येक ब्लॉक दरम्यान गर्डरचा काही भाग हा दोन्ही दिशेला विशिष्ट उंचीवरून खाली आणण्यात येणार आहे. रेल्वे परिसरातील ७.५ मीटर उंचीवरून पूल खाली आणण्यासाठी पश्चिम रेल्वेने ११ दिवसांचा ब्लॉकचा कालावधी मंजूर केला आहे. यामध्ये दररोज रात्रीच्या वेळेतील तीन तासात सरासरी ५५० मिमी इतक्या प्रमाणात गर्डर हा खाली आणणे शक्य होईल. (Gokhale Bridge)
(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; 13 जणांचा मृत्यू)
गोखले पुलाच्या सुमारे १३०० टन वजनी गर्डरचे लॉंचिंग करणे, गर्डर उत्तरेकडे सरकवणे आणि पुलाचा गर्डर सरकवल्यानंतर तो ७.५ मीटर खाली आणणे, हे अत्यंत कौशल्यपूर्ण काम हे ‘राईट्स’ या सल्लागार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. एकदा गर्डर खाली आणून स्थापन केल्यानंतर त्यावर सळ्या अंथरून सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरींगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिक करण्यात येईल. दरम्यान, ई महानगरपालिकेच्या हद्दीतील या पुलाच्या प्रवेश मार्गिकांचे बांधकामही तब्बल ८० टक्के कामही पूर्ण झाले आहे. नियोजनाप्रमाणे १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत गोखले पुलाच्या पहिला टप्प्याचे काम पूर्ण होऊन हा पूल अंशतः वाहतुकीकरीता खुला करण्याचे नियोजन असल्याचे पूल विभागाने स्पष्ट केले. (Gokhale Bridge)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community