पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या आईने बनवलेले अन्न खाण्यास प्रोत्साहित करावे. (Kerala High Court) तसेच अल्पवयीन मुलांना योग्य देखरेखीशिवाय मोबाईल फोन देणेही टाळावे, असे केरळ उच्च न्यायालयाने सूचित केले आहे. लहान मुलांसाठी मोबाईल फोनच्या धोक्याबाबत इशारा दिला. केरळ उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पीव्ही कुन्हिकृष्णन यांनी पोर्नोग्राफीशी संबंधित गुन्ह्याच्या प्रकरणाची सुनावणी करताना, मुलांसाठी घरीच आईने स्वतःच्या हाताने बनवलेल्या अन्नाचे महत्त्व अधोरेखित केले आणि पालकांनी आपल्या मुलांना स्विगी आणि झोमॅटोद्वारे रेस्टॉरंटमधून जेवण मागवू देणे टाळण्याचा सल्लाही दिला.
(हेही वाचा – MCGM Employee : बायोमेट्रिक हजेरी मशीन बंद म्हणून दुसऱ्या विभागात जाऊन हजेरी नोंदवू नका)
मुलांना खेळायला मैदानात पाठवा
उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, “स्विगी आणि झोमॅटोच्या माध्यमातून रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याऐवजी, मुलांना त्यांच्या आईनं तयार केलेले स्वादिष्ट पदार्थ चाखू द्या. पालकांनी मुलांना घरातच न ठेवता त्यांना खेळण्यासाठी खेळाच्या मैदानात पाठवा आणि नंतर त्यांच्या आईनं स्वतःच्या हातानं बनवलेले पदार्थ खाण्यासाठी द्या.” (Kerala High Court)
उच्च न्यायालयाने मोबाईलमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबतही माहिती दिली आहे. तसेच, हायकोर्टाने पालकांना इंटरनेटबाबत इशाराही दिला आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह मोबाइल फोनद्वारे अश्लील व्हिडीओंसह सर्व प्रकारचा कंटेंट सहज उपलब्ध होत असल्याचा उल्लेखही न्यायालयाने केला आहे. (Kerala High Court)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community