पोलिसांनो एक दिवस नागरिकांना द्या, नागिरक दिवस साजरा करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या सूचना

100

काही पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांना चांगली वागणूक मिळत नसल्याच्या, अनेक तक्रारी येत असल्याची खंत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्यक्त केली. तसेच, पोलीस ठाण्यात येणा-या नागरिकांसाठी आदराने, सौजन्याने वागा, त्यांना किमान पाणी, चहा विचारा असे सांगताना, पोलिसांनी आठवड्यातून किंवा महिन्यातून संपूर्ण एक दिवस नागरिकांना द्यावा म्हणजेच नागरिक दिवस साजरा करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी केल्या.

निवड प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना जबाबदारी सोपवण्यात येणार

पोलीस आयुक्त संजय राऊत यांनी विशेष म्हणजे चहाला पैसे नसतील, तर त्याचे बील माझ्याकडे पाठवा असेही आवर्जून नमूद केले. याबाबतचा योग्य तो आराखडा लवकरच जारी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे नागिरकांशी संवाद साधताना, सिटिझन फोरमच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

( हेही वाचा: शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी छत्रपती संभाजी राजेंना शिवसैनिकच व्हावे लागणार; शिवसेना भूमिकेवर ठाम )

बंदोबस्तादरम्यान पोलिसांना ‘नो फोन’

  • बंदोबस्तादरम्यान,अनेक पोलीस फोनवर असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे इथून पुढे बंदोबस्ताला असताना, पोलिसांना सोबत फोन नेता येणार नाही. त्यांनी बंदोबस्तादरम्यान मोबाईल फोन स्वत:कडे ठेवू नये, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
  • बंदोबस्ताला जाण्यापूर्वी फोन कार्यालयात जमा करण्याबाबत यावेळी नमूद करण्यात आले आहे. तसेच, आयपीएल बंदोबस्ताची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडल्याबाबत पोलिसांचे कौतुकदेखील यावेळी करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.