मालाडमध्ये नाझिया अन्सारीकडून National Flag चा अवमान; गुन्हा दाखल

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ स्थानिक लोकांनी तयार केला असून, त्या आधारे मालाड पश्चिम येथील मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

230

मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात एक गंभीर घटना समोर आली आहे, ज्यामध्ये धर्मांतरीत नाझिया मतिउल अब्दुल रहमान अन्सारी ( National Flag विवाहापूर्वीची नंदिनी शिंदे या महिलेने १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला. या महिलेले फडकावलेला राष्ट्रध्वज खाली पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यावेळी नाझियाने हिंदू धर्मियांना शिवीगाळ केली. यावेळी नाझियाने तिरंग्याला बांधलेली दोरी चाकूने कापण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार व्हिडिओमध्ये कैद केला. त्या आधारे नाझियाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ स्थानिक लोकांनी तयार केला असून, त्या आधारे मालाड पश्चिम येथील मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक अमृता देशमुख यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे. या घटनेनंतर देशभक्तांमध्ये प्रचंड संताप आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अशा देशद्रोही घटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अशा देशद्रोही कारवायांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी याप्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व देशभक्तांच्या वतीने करण्यात येत आहे.  (National Flag)

(हेही वाचा Kolkata Doctor Rape case प्रकरणी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात जुंपली)

राष्ट्रीय सण साजरा करण्यावर आक्षेप

या ठिकाणी सुखशांती चाळ, रहिवासी संघ आहे. या चाळ कमिटीमध्ये ४७ सभासद आहेत. कालपर्यंत या कमिटीचे अध्यक्ष अब्दुल कादरी अन्सारी होते. कमिटीच्या निवडणुकीत हरल्यानंतर आता अध्यक्ष अशोक यादव आहेत. तेव्हापासून अन्सारी आणि त्यांचे कुटुंब चाळीत राष्ट्रीय सण  (National Flag) साजरा करण्यावर आक्षेप घेत आहेत. म्हणूनच अन्सारी यांची सून नाझिया हिने १५ ऑगस्ट दिली फडकवण्यात आलेला राष्ट्रध्वज खाली उतरवण्यासाठी राष्ट्रवाजाला मारलेली गाठ कापली आणि राष्ट्रध्वज बांधलेला खांबही उखडून टाकण्याचा प्रयत्न केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.