लवकरच नवा महिना नोव्हेंबर सुरू होणार आहे. या नव्या महिन्यात तुमच्या दैनंदिन आयुष्यावर देखील परिणाम होणार असून तसे काही नियम देखील उद्यापासून बदलणार आहेत. हे नियम केवळ तुमच्या खिशावरच परिणाम करणारे नाहीत तर आरोग्याच्या आपत्कालीन वेळेच्या इन्शुरन्स क्लेमसाठी देखील महत्त्वाचे आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वे देखील हिवाळी टाईमटेबल देखील बदल करू शकते असे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – तुम्ही ऑनलाईन वीज बिल भरता? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा…)
दरम्यान, दर महिन्याच्या १ तारखेला गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात येतो. याप्रमाणे यावेळी देखील गॅस सिलिंडरच्या किंमती बदलल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १४ आणि १९ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत हे बदल केले जातात. १ ऑक्टोबरला कंपन्यांनी कमर्शिअल वापराच्या सिलिंडरच्या किंमतीत २५.५ रुपयांची घट करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती वाढत आहेत, यामुळे उद्या, १ नोव्हेंबरपासून LPG गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली जाऊ शकते.
… तरच मिळणार LPG गॅस सिलिंडरची डिलिव्हरी
असे सांगितले जाते की, नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेपासून डिलिव्हरी प्रक्रियेत बदल केला जाणार आहे. उद्यापासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडरसंदर्भातील ओटीपी दिल्यानंतरच डिलिव्हर केला जाणार आहे. ग्राहकाच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल. यानतंर तो ओटीपी डिलिव्हरी एजंटला द्यावा लागेल. हा ओटीपी दिल्यानंतरच सिलिंडर मिळणार आहे.
विमा नियामक IRDAI कडून होणार बदल
विमा नियामक IRDAI कडून नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेपासून एक मोठा बदल करण्यात येणार आहे. विमाधारकांना केवायसी तपशील प्रदान करणे अनिवार्य केले जाऊ शकते. आता नॉन-लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना केवायसी तपशील देणे ऐच्छिक आहे, परंतु उद्यापासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून ते अनिवार्य केले जाऊ शकते. विमा दाव्याच्या वेळी केवायसी कागदपत्रे सादर केली नाहीत तर दावा रद्द केला जाऊ शकतो. यामुळे हे खुप महत्वाचे आहे.
Join Our WhatsApp Community