तुम्हाला मधुमेहाचे निदान झाले आहे का? स्थूलपणा कमी करायला शस्त्रक्रिया करण्यासाठी विमा कंपन्यांची टाळाटाळ

113

मधुमेहाचे निदान झालेल्या लठ्ठ व्यक्तींना आता विमा काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मधुमेहाचे निदान झाले असेल तर वाढत्या बॅरिएट्रीक शस्त्रक्रियांसाठी मेडिक्लेम मिळणे आता विमा कंपन्यांनी कमी केले आहे. मेडिक्लेम काढण्यासाठी येणारी व्यक्ती अगोदरच लठ्ठ असेल आणि वैद्यकीय तपासणीत मधुमेहाचे निदान झाले असेल तर विमा कवच देताना कंपन्या आता माघार घेऊ लागल्या आहेत. हा केवळ बॅरिएट्रीस शस्त्रक्रियांचाच नव्हे तर मधुमेहाची त्रास असलेल्या हृदय विकार तसेच इतर आजारांच्या रुग्णांना आता विमा कवच मिळताना कंपन्यांनी पळती वाट पकडली आहे. कित्येकदा मेडिक्लेम प्रिमियमही वाढवला जात असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

मधुमेहतज्ज्ञांचे निरीक्षण – 

कोरोना काळात मृत्यूच्या दारातून परतलेल्या अनेक मधुमेहग्रस्त लठ्ठ रुग्णांनी तातडीने बॅरिएट्रीक शस्त्रक्रिया करुन घेतली. मधुमेहग्रस्तांना विमाही सहज उपलब्ध होत असल्याने बॅरिएट्रीक शस्त्रक्रिया वेगाने होऊ लागल्या. परिणामी विमा कंपन्यांना प्रचंड आर्थिक उलाढालीतून जावे लागले. त्यानंतर बॅरिएट्रीक शस्त्रक्रियांसाठी रुग्ण सूचवला जाऊ शकतो, ही कल्पना येण्याअगोदरच मधुमेहाचे तपासणीत निदान झाले की, थेट प्रिमियम विमा कंपन्यांकडून वाढवला जात आहे. मधुमेहग्रस्तांना मेडिक्लेम मिळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी दिली. मधुमेहासाठी बॅरिएट्रीक शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय असतो. औषधांचा वापर परिणामकारक दिसून येत नसेल, मधुमेह आणि वजन कमी होत नसेल तर बॅरिएट्रीक शस्रक्रिया सूचवली जाते. मधुमेह हा जीवनशैलीचा आजार आहे. मधुमेहामुळे होणा-या दुष्परिणामांमुळे डायलिसिस, हृदय विकाराचा आजार जडण्याची भीती असते. त्यामुळे मधुमेहाचे निदान झाल्यानंतर तातडीने चांगल्या जीवनशैलीचा स्विकार करुन हा आजार नियंत्रणात आणा, असे आवाहन डॉ. शशांक जोशी यांनी दिले.

(हेही वाचा मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात, ट्रक-बसच्या धडकेत 15 प्रवासी जखमी, दोघे गंभीर)

आयुषमान भारत योजनेत बॅरिएट्रीक शस्त्रक्रिया आणणे गरजेचे 

अनियंत्रित मधुमेह आणि खूप वजन जास्त असल्याने बॅरिएट्रीक शस्त्रक्रिया डॉक्टरांकडून सूचवली जात असल्याचे आता विमा कंपन्यांच्या लक्षात आले आहे. या हायरिस्क रुग्णांना मेडिक्लेम देताना कंपन्या नकार देत आहेत. मधुमेहाच्या रुग्णांच्या इन्शुअरन्स मिळणे आता कठीण होऊन बसले आहे. कित्येकदा रुग्णांनाही उशिराने मधुमेहाचे निदान होत आहे. बॅरिएट्रीक शस्रक्रियांची मागणी लक्षात घेता सरकारने आयुषयमान भारत योजनेत ही शस्त्रक्रिया आणणे गरजेचे आहे.
– डॉ. शशांक शाह, बॅरिएट्रीक सर्जन, लीलावती रुग्णालय, वांद्रे.

उच्च रक्तदाब, मधुमेह, बॅरिएट्रीक सर्जही ही कॉस्मेटीक सर्जरी असल्याचा दावा विमा कंपन्यांचा दावा आहे. हा आजार असल्याचे सिद्ध करण्याचे विमा कंपन्यांचा दावा आहे. शस्त्रक्रिया होण्याची शक्यता असल्याने रुग्णांसाठी थेट मेडिक्लेमचा प्रिमियमची किंमत वापर वाढत आहे.
– डॉ. जयेश लेले, जनरल फिजिशियन तसेच उपसचिव, भारतीय वैद्यकीय संघटना.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.