केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी क्षयरोग मुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या एकात्मिक धोरणाची घोषणा केली. जैवतंत्रज्ञान विभागाने, जगाला कोविडची पहिली डीएनए लस दिली, तो विभागच 2025 पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार पूर्ण करण्यासाठी, क्षयरोगाविरुद्धच्या या एकात्मिक, समग्र लढाईत महत्वाची भूमिका निभावणार आहे, असे जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले.
( हेही वाचा : “आम्ही सावरकर जगतोय आणि जगलोय… त्यांची वीर सावरकर नव्हे अदानी गौरव यात्रा”, राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र)
24 मार्च रोजी वाराणसी इथे जागतिक क्षयरोग शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनापासून प्रेरणा घेत, जितेंद्र सिंह यांनी बेंगळुरूच्या डीबीटी-इनस्टेम येथे भारतीय क्षयरोग जीनोमिक सर्व्हिलन्स कन्सोर्टियम (InTGS) च्या प्रायोगिक टप्प्याची सुरुवात करण्याची घोषणा केली.
क्षयरोगामुळे होणारे सखोल सामाजिक आणि आर्थिक परिणाम लक्षात घेऊन शासनाने भारताने 2025 पर्यंत ‘क्षयरोग मुक्त भारत’ उद्दिष्ट साध्य करण्याला प्राधान्य दिले आहे. तसेच, जैवतंत्रज्ञान, क्षयरोग निर्मूलनासाठी एकात्मिक सर्वांगीण आरोग्य सेवा दृष्टीकोनात मोठी भूमिका बजावणार आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले.
मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस (Mtb) ची जैविक वैशिष्ट्ये आणि त्याचे संक्रमण, उपचार आणि रोगाच्या तीव्रतेवर उत्परिवर्तनांचा प्रभाव पूर्णपणे समजून घेण्यासाठी अशाप्रकारचा हा पहिलाच देशव्यापी उपक्रम असेल, असेही डॉ सिंह यांनी सांगितले. भविष्यात क्षयरोगाचे निदान आणि त्यावर देखरेख ठेवणे यासाठीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठीचा पाया यातून निर्माण होऊ शकेल असे त्यांनी नमूद केले.
सर्वांगीण आरोग्य सेवेशी संबंधित विविध औषध प्रणालींसाठी एकात्मिक दृष्टिकोन अवलंबण्यावर सरकारचा भर राहील असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.
आरोग्यक्षेत्रात, केंद्र सरकार स्वदेशी संशोधन आणि विकासाला प्राधान्य देत आहे, असेही ते म्हणाले. जैवतंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन (DBT-inStem) मधील शास्त्रज्ञांद्वारे नवीन भारतीय रक्त पिशवी (ब्लड बॅग) तंत्रज्ञान विकसित करण्याची घोषणा त्यांनी केली.
Join Our WhatsApp Community