मुंबई-पुणे महामार्गावर वाढते अपघात; आता वाहनांवर राहणार ITMS सिस्टिमची नजर

131

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांना चाप लावण्यासाठी लवकरच या महामार्गावर इंटिलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS)बसविण्यात येणार आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यानंतर आयटीएमएस सिस्टिम बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महामार्गावर येत्या ९ महिन्यांमध्ये यंत्रणा बसविण्यात येणार असून त्यानंतर महिनाभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे.

( हेही वाचा : स्वस्त मस्त BEST! आता ३१ ऑगस्टपर्यंत करता येणार १ रुपयांत बसप्रवास; योजनेला मुदतवाढ)

आयटीएमएस (ITMS) यंत्रणा बसविण्याचा निर्णय

वर्षभरात अत्याधुनिक आयटीएसएम यंत्रणा कार्यान्वित होऊन वाहतुकीला शिस्त लागेल असा विश्वास एमएसआरडीसीकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई-पुणे महामार्ग प्रवासाच्या दृष्टीने महत्वाचा असून या महामार्गावरून दररोज अंदाजे ६० हजार वाहने धावतात. या मार्गासाठी वेगमर्यादा आधीच निश्चित करण्यात आली आहे. मात्र वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे आणि इतर नियमांचे पालन होत नाही. यामुळेच हा महामार्ग दिवसेंदिवस वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असून अपघातांचे प्रमाण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने येथे अत्याधुनिक अशी आयटीएमएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर या यंत्रणेच्या माध्यमातून दंड ठोठावला जाणार आहे. तसेच ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नाइझेशन यंत्रणा सुद्धा बसवली जाणार असून याद्वारे पथकर नाक्यावर दंड गोळा केला जाणार आहे.

या यंत्रणा बसविणार

  • वेग मर्यादा तपासणी – ३९ ठिकाणी
  • मार्गिका शिस्तपालन – ३४ ठिकाणी
  • सीसीटीव्ही कॅमेरा – १३० ठिकाणी
  • परिवर्तनीय संदेश देणारी चिन्हे – २३ ठिकाणी
  • हवामान यंत्रणा – ११ ठिकाणी
  • पाळत ठेवणाऱ्या व्हॅन – ४
  • वाहन ट्रॅकिंग प्रणाली – ३६ (यामध्ये अ‍ॅम्ब्ल्युलन्स, क्रेन, टोविंग व्हॅनचा समावेश असेल)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.